अभिमानास्पद...महिला कर्मचारी प्रथमच कृषी सहाय्यकपदी!* अश्विनी नाईक यांनी जिद्द आणि परिश्रमातून घडवला इतिहास

अभिमानास्पद...महिला कर्मचारी प्रथमच कृषी सहाय्यकपदी!
* अश्विनी नाईक यांनी जिद्द आणि परिश्रमातून घडवला इतिहास
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
      येथील भाऊसाहेब फुंडकर कृषी महाविद्यालयाच्या इतिहासात प्रथमच महिला कर्मचाऱ्याची कृषी सहाय्यकपदी निवड झाली आहे. महाविद्यालयासाठी हा अभिमानाचा क्षण आहे. त्यांच्या या यशामुळे इतर महिलांना देखील कृषी क्षेत्रात पुढे येण्याची प्रेरणा मिळेल, असा विश्वास व्यक केला जात आहे. 

       डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला अंतर्गत बुलढाणा येथे भाऊसाहेब फुंडकर कृषी महाविद्यालय आहे. या महाविद्यालयाच्या इतिहासात महिला कर्मचारी कृषी सहाय्यकपदी नियुक्त झालेली नाही. मात्र, अश्विनी नारायण वैद्य तथा अश्विनी शंकर नाईक यांनी ही किमया करुन दाखवली आहे.

         अश्विनी नाईक यांनी आपल्या जिद्द , मेहनत आणि अभ्यासाच्या जोरावर हे यश संपादन केले आहे. ग्रामीण भागातील महिलांसाठी त्यांची ही निवड प्रेरणादायी ठरणार आहे. कृषी क्षेत्रात महिला देखील पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करू शकतात, हे त्यांनी दाखवून दिले आहे. त्यांच्या निवडीबद्वल कुटुंबीय, मित्र परिवार आणि महाविद्यालयातील कर्मचारी वर्गाकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.