मालतीताई शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त शैक्षणिक साहित्य वाटप

मालतीताई शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त शैक्षणिक साहित्य वाटप
इसोली : (एशिया मंच न्यूज )
       साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती व राजर्षी शाहू मल्टीस्टेटच्या अध्यक्षा मालतीताई शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त 1 ऑगस्ट रोजी येथील जि. प. शाळेत शालेय साहित्य वाटप करण्यात आले. 
       सुरुवातीला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. शाळा समितीचे उपाध्यक्ष कैलास शिंदे, सुभाष आटोळे, भीमराव गिरगुणे, दादाराव पवार, भगवान शिंदे यांच्यावतीने शालेय साहित्य व खाऊ वाटप करण्यात आला. यावेळी राजर्षी शाहू मल्टीस्टेटचे विभागीय व्यवस्थापक गोविंद येवले यांची प्रमुख उपस्थिती होती. राजू कोकाटे, संदीप पवार, अंगणवाडी सेविका यांच्यासह शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.