* अखेर तो गहु निघाला शेतकऱ्याच्या मालकीचा...
मेहकर : (एशिया मंच वृत्त)
कुठल्या गोष्टीबद्दलचा अतिउत्साह किती घातक असतो याचा प्रत्यय नुकत्याचं एका घटनेतून आला आहे. कुठलीही शहानिशा न करता रेशनचा गहु काळयाबाजारात विक्रीला चालल्याची अर्धवट माहिती घेवून देऊळगाव साकर्शा सरपंच संदीप आल्हाट यांनी जानेफळ पोलीस स्टेशनचे ठाणेदार राहुल गोंधे व मेहकर तहसीलचे पुरवठा अधिकारी गजानन टेकाळे यांना माहिती देवून सस्पेंस निर्माण केला मात्र प्रत्यक्षात चौकशी नंतर तो गहु एका शेतकऱ्याच्या मालकीचा असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने सरपंचाने केलेल्या घाईची चर्चा परिसरात होत आहे. मेहकर तालुक्यातील देऊळगाव साकर्शा येथील सरपंच संदीप आल्हाड यांच्या अतिउत्साही पणामुळे घडला. विचित्र प्रकार शेतकरी नामदेव गायकवाड यांचा स्वतःच्या मालकीचा असणारा १७ पोते गहू खामगाव मार्केटमध्ये विकण्यासाठी पीकअप वाहन क्रमांक एम एच.0४ जीआर६०६९ या नंबरच्या गाडीत शेतकरी नामदेव गायकवाड यांनी आपल्या मालकीचा १७ पोती गहू घेऊन खामगाव मार्केटमध्ये नेण्यासाठी पीकअप घेऊन निघत आसताच संरपच संदीप आल्हाट यांनी पुरवठा अधिकारी गजानन टेकाळे व जानेफळ ठाणेदार राहुल गोंधे यांना भ्रमणद्वारे संपर्क साधला व चोरीचा गहु काळ्याबाजारात विक्रीसाठी जात आहे व तो गहु मी पकडला अशी अतिउत्साही पणाची माहिती देल्यामुळे शेतकरी नामदेव गायकवाड यांच्या स्वतःच्या मालकीचा गहू आसताना चोरीआळ बसल्यामुळे शेतकरी यांना आपलाच मालीकीचा गहु आहे हे सिद्ध करण्यासाठी धडपड करावी लागली. प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला तो संरपचाच्या अतिउत्साही पणामुळे. गावातील राजकराणापोटी शेतकऱ्याला अशा प्रकारचा चोरीचा आरोप सहन करावा लागला अशी चर्चा लोकांमध्ये होताना दिसत आहे.