सहकार विद्या मंदिर ॲन्ड ज्यु. कॉलेज चे NEET व MHT-CET परिक्षेत गौरवशाली यश

सहकार विद्या मंदिर ॲन्ड ज्यु. कॉलेज चे NEET व MHT-CET परिक्षेत गौरवशाली यश
बुलडाणा :  (एशिया मंच वृत्त)
     स्थानिक सहकार विद्या मंदिर अॅन्ड ज्यु. कॉलेज या मान्यता प्राप्त निवासी व अनिवासी शाळेच्या विद्यार्थ्यांनी अभुतपुर्व यशासह NEET परिक्षेत यश मिळविले आहे. त्याच्या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे. NEET परिक्षेमध्ये विद्यार्थी अत्यंत उत्कृष्ट गुणांसह यशस्वी झाले आहेत. या यशाने सहकार विद्या मंदिरने विद्यार्थ्यांवर घेतलेल्या कठोर परिश्रम व सर्वांगीण विकासावर मोहोर उमटवली.
       यावर्षी 720 पैकी 619 गुण मिळवित चि. प्रणव चौधरी याने प्रथम क्रमांक प्राप्त केला. तर 618 गुणांसह दर्पण मुठा याने द्वितीय क्रमांक प्राप्त केला. तर कु. साक्षी चोपडे हिने 602 गुणांसहित तिसरा क्रमांकाचे गुण प्राप्त केले तर 590 गुणांसहित कु. अस्मिता वानखेडे हिने चौथा क्रमांक प्राप्त केला आहे. राष्ट्रीयस्तरावर संपन्न होणाऱ्या या परिक्षेत विद्यार्थ्यांना मेडिकल प्रवेशासाठी उत्कृष्ट गुण प्राप्त करणे आवश्यक आहे. कोरोना काळात विद्यार्थ्यांचे मानसिक मनोबल व विश्वास कायम ठेवणे हे शिक्षकांसमोरील मोठे आव्हान होते. यामध्ये शिक्षकांनी सातत्यपूर्ण शिक्षण दिले तर विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रम करीत यश प्राप्त केले. तसेच MHT-CET परिक्षेत देखील विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट यश प्राप्त केले आहे. यशस्वी विद्यार्थ्यांमधुन चि. दर्पण मुठा व कु. अस्मीता वानखेडे यांनी 99.77 पसॅटाईल सह सयुक्तरित्या प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. तसेच कु. साक्षी चोपडे, मो. फैजान, अथर्व जुमडे, अदित्य जाधव, कुणाल सिंगरकर, गौरव वानखेडे, फराज रिजवी, मैत्रय सालोडकर, कु. स्मितल चौधरी, सृष्टी गजरे, पुनम नालींदे, कोमल निमसे, शगुफ्ता पटेल व वैष्णवी देशमुख यांनी देखील उत्कृष्ट गुणांसह यश प्राप्त केले आहे.
     बुलडाण्यासारख्या ग्रामीण भागात वसलेल्या या शाळेचे वैशिष्टे म्हणजे केवळ महाराष्ट्रातून नाही तर देशातील विविध राज्यातील विद्यार्थी या ठिकाणी शिक्षणासाठी येतात. शाळेचे निर्सगरम्य वातावरण, पारंपारिक शिक्षण शैलीसह आधुनिक तंत्रज्ञानाने विद्यार्थ्यांना शिकविण्याची पद्धती, भव्य क्रिडांगण तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर देण्यात येणारे लक्ष हे या शाळेची वैशिष्ट्ये आहेत.
     विद्यार्थ्यांनी प्राप्त केलेल्या या यशाबद्दल बुलडाणा अर्बनचे संस्थापक अध्यक्ष  राधेश्यामजी चांडक, संस्थेच्या अध्यक्षा सौ. कोमलताई सुकेशजी झंवर, संस्थेचे मुख्य कार्यकारी संचालक डॉ. सुकेशजी झंवर, प्राचार्य  अलगर सामी यांनी विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे अभिनंदन करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्यात.
विद्यार्थ्यांनी त्यांच्या यशाचे श्रेय अध्यक्षा सौ. कोमलताई झंवर, प्राचार्य विभाग प्रमुख व सर्व शिक्षकवृंद यांना दिले.