बुलडाणा अर्बनच्या खातेदारांनी अफवेला बळी पडू नये* इन्कमटॅक्स विभागाची रेड नव्हे, ती केवळ बॅँक खात्यांची चौकशी* बुलडाणा अर्बनचे संस्थापक अध्यक्ष भाईजींचे स्पष्टीकरण

बुलडाणा अर्बनच्या खातेदारांनी अफवेला बळी पडू नये
* इन्कमटॅक्स विभागाची रेड नव्हे, ती केवळ बॅँक खात्यांची चौकशी
* बुलडाणा अर्बनचे संस्थापक अध्यक्ष भाईजींचे स्पष्टीकरण
 बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
     बुलडाणा अर्बन मल्टी स्टेट को-ऑपरेटिव्ह संस्थेच्या मुख्य शाखेमध्ये मागील पाच दिवसांपासून आयकर विभागाच्या पथकाकडून चौकशी सुरू होती, याबाबत अनेक अफवा पसरविण्यात आल्या होत्या, मात्र तो आयकर विभागाचा छापा नसून बँक खात्यांची रूटीन चौकशी असल्याचे स्पष्टीकरण बुलडाणा अर्बन पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक यांनी देवून,  बुलडाणा अर्बनच्या खातेदारांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, संस्थेच्या खातेदारांच्या ठेवी पूर्णपणे सुरक्षित असल्याची माहितीही त्यांनी दिली.
    आशिया खंडातील सर्वात मोठी संस्था म्हणून नावाजलेली बुलडाणा अर्बन को-ऑपरेटिव्ह मल्टीस्टेट संस्थेच्या बुलडाणा येथील मुख्य शाखेमध्ये मागील चार-पाच दिवसांपासून आयकर विभागाच्या पथकाकडून तपासणी सुरू होती. यासंदर्भात काहीजणांनी छापा पडल्याचे अफवा पसरविली मात्र बुलडाणा अर्बन संस्थेवर आयकर विभागाच्या कुठल्याही प्रकारचा छापा नसून काही नावांच्या खात्यांची त्यांनि चौकशी केली असल्याचे समोर आले आहे.