* पत्रकार परिषदेत आ.संजय गायकवाडांनी दिली शहरवासीयांना दिवाळी भेट
बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
एरवी पाणी टंचाईने त्रस्त झालेल्या बुलडाणावासीयाना बुलडाणा विधानसभेचे शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी दिवाळीची भेट दिली असून, दिपावली पर्वावर शहरवासीयांना दररोज तर दिवाळीनंतर एक दिवसाआड नळाव्दारे पाणी पुरवठा करण्याचे नियोजन केले असल्याची माहिती रविवार 31 ऑक्टोबर रोजी त्यांच्या मातोश्री संपर्क कार्यालयावर बोलावलेल्या पत्रकार परिषदेतून दिली. त्यांच्या या घोषणेमुळे शहरवासीय विशेष करून गृहीणींसाठी ही खरीखुरी दिवाळी भेट ठरणार आहे.
बुलडाणा शहराला सध्यस्थितीत सात दिवसाआड पाणी पुरवठा केला जातो. त्यामुळे एका परिसरात नळाव्दारे पाणी आल्यानंतर त्या भागातील रहिवासी नागरिकांना पाण्यासाठी आठ दिवस वाट पाहावी लागते. दिवाळीच्या सणामध्ये असा त्रास व्हायला नको, त्यामुळे दिवाळी दरम्यान दररोज शहरवासीयांना पाणी पुरविले जाणार आहे. विशेष म्हणजे शहरात उपलब्ध असलेल्या तिन पाण्याच्या टाकीमधूनचं हा पाणी पुरवठा केला जाणार असून, दिवाळीनंतर एक दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आल्याचीही माहिती त्यांनी दिली. सध्यस्थितीत स्थानिक चैतन्यवाडी येथील 25 लाख लिटर पाण्याच्या टाकीव्दारे चैतन्यवाडी, विष्णुवाडी, अष्टविनायक नगर, लक्ष्मीनगर, सरस्वती नगर, महावीर नगर, जगदंगा नगर, केशव नगर, एकता नगर, जिजामाता नगर, लहाने ले आउट, रामनगर, सदाफुली सोसायटी, पाळणा घर, राजगुरे ले आउट, छत्रपती नगर, जिल्हाधिकारी निवासस्थानामागील भाग, सर्कल्युर रोड, सरकारी निवासस्थान, दलालवाडी, पोलीस लाईन कानडे नगर, इकगाल नगरमधील 13 लाख लिटर क्षमतेच्या पाणी टाकीव्दारे बाजारलाईन, भीमनगर, इकबाल नगर, मार्केट एरीया, स्मशानभूमी परिसर, जोहर नगर, गवळीपुरा, जवाई नगर मिर्झा नगर, भंगार लाईन, क्रांतीनगर, सराफालाईन, संभाजीनगर, शिवनेरी नगर, कारंजा परिसर व पोलीस मुख्यालय परिसर आणि शहराला पाणी पुरवठा करणा-या सोळंके लेआउट मधील 11 लाख लिटर क्षमतेच्या पाण्याच्या टाकीव्दारे सोळंके लेआउट, गणेश नगर, चंद्रमणी नगर, क-हाळे ले आउट, क्रिडा संकुल परिसर, वावरे ले आउट, विदभर्र् हाउसिंग सोसायटी, आरस लेआउट, मुठठे ले आउट, जॉन बंगला परिसर, वानखडे ले आउट, भिलवाडा, जुनागाव व टिळकवाडी भागातील नागरिकांना पाणी पुरवठा करण्यात येणार असल्याचे ही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
