आमदार संजय गायकवाड यांच्या हस्ते निडली वुमन सेफ्टी अप्स चे लोकार्पण

आमदार संजय गायकवाड यांच्या हस्ते निडली वुमन सेफ्टी अप्स चे लोकार्पण
बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
      महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे.अशात ऑनलाईनच्या विश्वात महिला सुरक्षेसाठी काही महत्त्वाचे आणि उपयोगी अ‍ॅप तयार करण्यात आले आहेत. शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्या पुढाकाराने आज 31 ऑक्टोंबर रोजी निडली वूमन सुरक्षा ॲपचे लोकार्पण करण्यात आले आहे. यूजरच्या आवाजाचा मेसेज, लोकशन नातेवाईकांच्या नंबर ला व आपत्कालीन नंबरवर पाठवला जाऊ शकतो. ज्याने तात्काळ मदत पोहोचवण्यास शक्य होते हे वूमन सेफ्टी अ‍ ॅपचे खास वैशिष्ट्य आहे.
     महिला सुरक्षा हा सध्या महत्त्वाचा मुद्दा आहे. उत्तर प्रदेशच्या हाथरस प्रकरणानंतर महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा पेटून उठला. रोज म्हटले तरी महिला अत्याचाराच्या आणि लैंगिक छळाच्या घटना देशात समोर येत आहेत. कुठल्याही क्षेत्रात महिला सुरक्षित नाही हे वेळीवेळी समोर आले आहे. महिला अत्याचाराची एखादी घटना समोर आली की, राजकारण, कँडल मार्च आणि न्यायासाठी आंदोलन झाल्याचे दिसून येते. महिलांना शारिरीकदृष्ट्या सक्षम करणे महत्त्वाचे आहे. त्यांना लहानपणापासून शारिरीक व्यायाम, कराटेसारख्या शैली अवगत असल्या पाहिजे. पण अशात ऑनलाईनच्या विश्वात महिला सुरक्षेसाठी काही महत्त्वाचे आणि उपयोगी अ‍ॅप तयार करण्यात आले आहेत.
महिलांवर कुठलाही अतिप्रसंग आला तर महिलेच्या हातात असे शस्त्र हवे ज्याने त्या नराधमांना सडेतोड उत्तर देता येईल. त्यामुळे मोबाईलमध्ये असे काही अ‍ॅप तयार करण्यात आले आहेत ज्याने महिलांना सुरक्षेसाठी मदत करता येईल. वूमन सेफ्टी अ‍ ॅपचे खास वैशिष्ट्य म्हणजे मेसेज आणि लोकशन नातेवाईकांच्या नंबर ला व आपत्कालीन नंबरवर पाठवला जाऊ शकतो. ज्याने तात्काळ मदत पोहोचवण्यास शक्य होते. या वूमन सेफ्टी अ‍ ॅपचे आमदार संजय गायकवाड यांच्या हस्ते बुलडाणा येथील मातोश्री कार्यालयावर लोकार्पण करण्यात आले. मोबाईल मध्ये इंटरनेट नसले तरीही मेसेज जाऊ शकतो. अशी माहिती यावेळी संचालक भुतडा व सहकारी उमेश लवंगे यांनी दिली. यावेळी धर्मवीर आखाडे चे अध्यक्ष मृत्युंजय गायकवाड, ओमसिंग राजपूत, आमदार संजय गायकवाड यांचे स्वीय सहाय्यक श्रीकृष्ण शिंदे यांच्यासह जिल्हाप्रमुख चंदाताई बढे, ताप्र अंजनाताई खुपराव, शहर प्रमुख वैशाली ठाकरे, डॉक्टर नंदिनीताई रिंठे, ज्योतीताई पाटील, राठोड ताई, सरपंच काळवाघे ताई, शोभाताई चांदोरे, प्रभाताई ठाकूर, निर्मलाताई मांडवी महिलांची उपस्थिती होती.