शंभरीकडे झुकलेल्या वृध्दावर डॉ.विवेक मोरेंची यशस्वी शस्त्रक्रिया

शंभरीकडे झुकलेल्या वृध्दावर डॉ.विवेक मोरेंची यशस्वी शस्त्रक्रिया
बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
     वयाच्या शंभरीकडे झुकलेल्या एका वृध्दावर बुलढाणा येथील अस्थिरोग तज्ञ डॉ.विवेक मोरे यांनी यशस्वी शस्त्रक्रिया करून आपल्या अंगभूत डॉक्टरी कौशल्याची चुणूक दाखविली.
     त्याचे झाले असे की, चिखली तालुक्यातील शेलसूर येथील रहिवासी नारायणराव देशमुख वय 95 हे जांघेतील हाडाच्या व्याधीने त्रस्त झाले होते. जांघेचे हाड फॅक्चर झाल्याने त्यांना खुपचं वेदना होत होत्या. तेंव्हा कुटूंबियांनी त्यांना बुलडाणा येथील अस्थीरोग तज्ञ डॉ. विवेक मोरे, एमएस आथोर्र् आयएमएस दिल्ली यांच्या दवाखान्यात उपचारासाठी घेवून आले. आवश्यक तपासण्या झाल्यानंतर शस्त्रक्रिया करण्याचा निणर्र्य डॉक्टरांनी घेतला. रूग्णाची आधीचं हार्ट सर्जरी झालेली, त्यातही किडनी व्यवस्थित कार्य करीत नसल्याने त्यांचे वय पाहता ही शस्त्रक्रिया खुपचं क्लीष्ट आणि जटील असल्याचे पुढे आले. दरम्यान रूग्ण नारायणराव देशमुख यांनी स्विकृती दिल्याने शस्त्रक्रियेचे चॅलेंज स्विकारून बुलडाणा मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटलमध्ये यशस्वी शस्त्रक्रिया केली. शस्त्रक्रिये नंतर 95 वर्षवषीर्र्य आजोबा व्यवस्थित चालत असल्याचे बघुन त्यांच्या कुटूंबियाच्या डोळयात आनंदाश्रु तरळले होते. या शस्त्रक्रिये दरम्यान डॉ. सुनील राजपूत यांनी रूग्णाच्या हृदयाची काळजी घेतली.डॉ. रामलाल वैराळकर,  भूलतज्ञ डॉ. विजय पाटील यांनी शस्त्रक्रिये दरम्यान मोलाचे सहकार्य केले. डॉ. विवेक मोरे यांचे सहकारी मिलिंद इंगळे आणि संपुणर्र् टिम ने देखील यावेळी आपले योगदान दिले.