राष्ट्रवादी काँग्रेसचे मनोजभाउ दांडगे यांनी जोपासली सामाजिक बांधिलकी....* निराधार व विधवा भगिणींना भाउबिज निमित्त केले साडी,चोळी वाटप

राष्ट्रवादी काँग्रेसचे मनोजभाउ दांडगे यांनी जोपासली सामाजिक बांधिलकी....
* निराधार व विधवा भगिणींना भाउबिज निमित्त केले साडी,चोळी वाटप
बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
      राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष मनोजभाऊ दांडगे यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत जामठी येथील निराधार व विधवा महिलांना दिवाळी निमित्त साडी,पातळ,चोळी व फराळाचे वाटप करून भाऊबीजची भेट दिली.याप्रसंगी गावातील विविध सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. दिवाळी सण म्हटलं की सर्वत्र रेलचेल आपल्याला पाहायला मिळते,प्रत्येक घरात रंगरंगोटी केली जाते,घरातील प्रत्येक सदस्याला नवीन कपडे विकत घेतले जातात परंतु जे निराधार आहेत,विधवा महिला आहेत त्यांची सुद्धा दिवाळी आनंदात होणे महत्वाचे आहे.याच गोष्टीचा विचार करून मनोजभाऊ दांडगे यांनी गेल्या 4 वर्षापासून निराधार व विधवा भगिणीसोबत दिवाळी साजरी करण्याची संकल्पना डोळ्यासमोर ठेवून उपक्रम जामठी गावात एका भगिनी पासून सुरुवात करून केला होता,व या 4 थ्या वर्षी सुद्धा संपूर्ण जामठी गावातील 67 निराधार व विधवा भगिनी सोबत दिवाळी साजरी केली.मा.मनोजभाऊ दांडगे यांनी निराधार व विधवा भगिनींना दिवाळीनिमित्त भाऊबीज ची भेट म्हणून एक साडी,पातळ व दिवाळीचे फराळ देऊन सामाजिक बांधिलकी जपली,या मनोजभाऊ यांच्या आगळ्यावेगळ्या उपक्रमाने गावातील सर्वांचे लक्ष वेधून घेतले जाते. जेव्हा निराधार व विधवा भगिनी दांडगे साहेब यांच्याशी संवाद साधत होत्या तेव्हा त्या सर्व भगिनींच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते,हे पाहतअसताना सर्व भगिनींच्या चेहऱ्यावरचा आनंद बघताना मनोजभाऊ यांना सुद्धा आपण काहीतरी सामाजिक काम केल्याचा मनस्वी आनंद झाला.
     यावेळी राष्ट्रवादी नेते जाकिर शेख, भगवान तायडे, रामेश्वर तायडे, बिलाल गायकवाड, गणेश तायडे मनोहर तायडे, कैलाश तायडे, निर्मलाताई तायडे शालिग्राम तायडे, समाधान तायडे, शेषराव तायडे, रमेश तायडे, संजय तायडे, अमिन खासाब, सलीम खान, अलीम खान, हरीभाऊ गायकवाड, संदीप सोनुने, विलास तायडे, रामभाऊ तायडे, विनोद रावळकर, पिंटू पवार, समाधान कल्याणकर, संदीप तुकाराम तायडे, तेजराव रावळकर, कृष्णा खरात, राजु सोनुने, रवींद्र तायडे, रवींद्र माळोदे, उमेश दांडगे, संतोष दांडगे, किसन थोरात, तेजराव गायकवाड, बाळासाहेब तायडे, गणेश पवार, आकाश तायडे, गजानन तायडे, विष्णु धांडे, दीपक रावळकर, बाळू तडवी, नारायण गायकवाड, परशु धोंड, नंदू अवसरमोल, विनोद तायडे, निलेश हिवाळे, निखिल गरुड आदींची उपस्थिती होती.