डिजीटल पद्धतीने सदस्य नोंदणी अभियान राबविणार- सुनिल शेळके* ओबीसी अधिकारी-कर्मचारी संघाची बैठक संपन्न

डिजीटल पद्धतीने सदस्य नोंदणी अभियान राबविणार- सुनिल शेळके
* ओबीसी अधिकारी-कर्मचारी संघाची बैठक संपन्न
 बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
      ओबीसी अधिकारी-कर्मचारी संघाची 
 स्वतंत्र वेबसाईट निर्माण करण्यात येणार आहे. या वेबसाईटवर संघटनेची ध्येय-धोरणे, उद्दिष्टे यासह ओबीसी विषयक सवलती, शिष्यवृत्ती व शासननिर्णय आदी माहिती अद्ययावत असणार आहे. या ऍपवरून डिजिटल पध्द्तीने सदस्य नोंदणी अभियान संपूर्ण राज्यभर राबविण्यात येणार आहे, अशी माहिती संस्थापक अध्यक्ष सुनील शेळके यांनी दिली.
      ओबीसी अधिकारी कर्मचारी संघाच्या जिल्हा कार्यकारिणीची बैठक शनिवारी (ता. 6) येथे संपन्न झाली. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून संघाचे संस्थापक श्री सुनिल शेळके बोलत होते. बैठकीत मागील महिन्यातील संघटनेच्या कार्याचा आढावा घेण्यात आला. संघटनात्मक बांधणी कशी मजबूत करता येईल यावर त्यांनी मार्गदर्शन केले. ओबीसी समाजासमोरील येणारे संभाव्य आव्हाने व सद्यस्थिती बद्दलही त्यांनी माहिती दिली. पुढील महिन्यात संघटनेची स्वतंत्र वेबसाईट निर्माण होणार आहे. त्यामुळे कामे अधिक सुलभ होतील, असे त्यांनी सांगितले. यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर पवार, राज्य मार्गदर्शक डॉ. शिवशंकर गोरे, आशिष वाघ, सदस्य गजानन राऊत, अनिल पवार, अनिल हिस्सल, संजय खांडवे, अमोल वाघमारे, सिद्धेश्वर मंडळकर, रवींद्र सावळे, श्री. मुळे यांची उपस्थिती होती.