मोताळा : (एशिया मंच वृत्त)
बुलडाणा कडे जात असलेल्या स्वीफ्ट डिजायर कार व मोताळा कडे येणाऱ्या दुचाकीचा भीष्म अपघात झाल्याच्या घटना आज 8 नोव्हेंबर रोजी रात्री 7 वाजेच्या सुमारास घडली अपघातात कार मधील प्रवाशी किरोकळ जखमी झाले असुन दोन्ही दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले आहे. या बाबत सविस्तर वृत्त असे की मोताळा कडून बुलडाणा कडे जात असलेल्या स्वीफ्ट डिजायर क्रमांक MH 28 AN 2529 ला समोरून येणाऱ्या दुचाकी क्रमांक MH 37 C 9018 वर असलेल्या मद्यधुंद दोघांनी समोरासमोर जोरदार धडक दिली.धडक इतकी भीष्म होती की कार संपूर्ण नुकसानग्रस्त झाली असुन दुचाकीस्वार दोन्ही कारच्या समोरील बाजुवर पडुन रस्त्यावर पडले. अपघात घडते वेळी आपले कर्तव्य बजावत असलेले महामार्ग पोलीसचे अधिकारी, कर्मचारी यांनी तात्काळ अपघात स्थळावर धाव घेत अपघातातील जखमींना बाहेर काढत 108 रुग्ण वाहिका उपलब्ध करून देत त्यांना मदत केली. घटनेची माहिती मिळताच बोरखेडी पोलीस ठाण्याचे पी.एस.आय अशोक रोकडे, पोहे कॉ गोरे, पो हे कॉ खेडेकर, पोकॉ मोरे, पोकॉ वाघ, पोकॉ हिवाळे होमगार्ड सोनुने यांनी घटनास्थळ गाठत अपघातात जखमींना उपचारासाठी 108 रुग्ण वाहिकेच्या माध्यमातून जिल्हा सामान्य रुग्णालय बुलडाणा येथे पाठवले असुन दोन्ही दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले असुन मद्यधुंद अवस्थेत आहे तर कार मधील महिला व लहान मुलांना किरकोळ जखमी झाले आहेत. वृत्त लिहे पर्यत कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल करण्यात आलेला नव्हता.
