* जिल्हा सामान्य रुणालयातील घटना
बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
एक महिना वय असलेले स्त्री जातीचे बाळ बेवारस टाकून एक अज्ञात महिला पसार झाली. ही घटना 25 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात घडली असून सामान्य रुग्णालयातील रक्तपेढी समोर स्त्री जातीचे बाळ टाकण्यात आले. याप्रकरणी रुगणालय प्रशासनाने पोलिसांत धाव घेऊन अज्ञात मातेविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. तर बाळाची तपासणी करून बालकांच्या अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे.
येथील जिल्हा सामान्य रुणालयात गुरुवारी सायंकाळी परिचारिकांचा राऊंड सुरु असताना परिचारिका सुनिता काळवाघे यांना शासकीय रक्तपेढीजवळ एक बेवारस बाळ कपड्यात गुंडाळले दिसून आले. त्यांनी रुग्णालय प्रशासनाला याबाबत माहिती दिली असता तेथे उपस्थित असलेल्या डॉ. राधा भानुसे आणि डॉ. सुरेश काकड यांनी त्या अर्भकाची आधी वैद्यकीय तपासणी केली. बाळाची तब्येत ठीक खात्री झाल्यावर त्या बाळाला अतिदक्षता विभागातील निगराणीखाली ठेवण्यात आले.
त्यानंतर कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण येथील शहर पोलिसांत मातेविरुद्ध तक्रार दाखल आली. ज्या महिलेने या बाळाला टाकले, ती सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये स्पष्टपणे दिसून येत आहे. सीसीटीव्हीच्या फुटेजवरून या बाळाच्या मातेचा शोध घेतला जात आहे. पोलीस कैलाश जाधव या मातेचा शोध घेत आहेत.
