जिल्हा सामान्य रुग्णालयात नवजात अर्भक टाकून महिला फरार * महिला सीसीटीव्हीत कैद

जिल्हा  सामान्य रुग्णालयात नवजात अर्भक टाकून महिला फरार 
* महिला सीसीटीव्हीत कैद
बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
    जवळपास एक महिन्याचे असलेले स्त्री जातीचे अर्भक टाकून एक अज्ञात महिला फरार झाल्याची घटना २५ नोव्हेंबरच्या संध्याकाळी जिल्हा सामान्य रुग्णालयातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसून येत आहे.
       या घटनेबाबत मिळालेली माहिती अशी की, स्त्री जातीचे अर्भक  त्या बाळाचे रडण्याचे आवाज ड्युटीवर कर्तव्य बजावत असलेल्या काळवाघे सिस्टरला आल्यानंतर त्यांचे लक्ष तिकडे गेले असता त्यांनी त्या बाळाच्या आई-वडीलाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला परंतु तिथे कुणीच आढळून आले नाही. तद्नंतर काळवाघे सिस्टर यांनी सदर बाब ही वैद्यकीय अधिकारी डॉ. राधा भानुसे यांना सांगितली. त्यावर डॉ. भानुसे यांनी लगेच पोलिसांना लेखी तक्रारीव्दारे ही घटना कळविली असून पोलिस कैलाश जाधव या मातेचा शोध घेत आहेत. एका महिन्याच्या या स्त्री जातीचे नवजात शिशु उपचार कक्षात ठेवण्यात आले आहे.