चिखली येथील कमलेश पोपट हत्या प्रकरणातील तीन आरोपी जेरबंद

चिखली येथील कमलेश पोपट हत्या प्रकरणातील तीन आरोपी जेरबंद
बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
चिखली येथील व्यापारी कमलेश पोपट यांच्या हत्या प्रकरणातील तीन आरोपींना ताब्यात घेण्यात चिखली पोलिसांना यश आले आहे.  17 नोव्हेंबर 2021 रोजी फिर्यादी मनन कमलेश पोपट वय 27 वर्ष रा. क्रिडा संकुल समोर, खामगांव रोड चिखली यांनी रिपोर्ट दिला की, 16 नोव्हेंबर 2021 रोजी रात्री 10  वाजे दरम्यान फिर्यादी यांचे वडील कमलेश डायालाल पोपट वय 61 वर्ष हे त्यांचे आनंद इलेक्ट्रॉनिक्स दुकानमध्ये दुकानचे लहान शेटर अर्धे उघडे ठेवुन हिशोब करीत असतांना अचानक अनोळखी तीन इसमांनी दुकानात प्रवेश करुन बंदुकीचा दाखवुन तलवारीने वार केले व जबरदस्तीने फिर्यादीच्या वडीलांच्या गळयातील सोन्याची चैन व नगदी 15 ते 20 हजार रुपये चोरुन नेले. चोरी करतांना तलवारीने व बंदुकीच्या मुठीने तोंडावर व पोटावर मारहाण करुन जीवानीशी ठार मारले आहे. याबाबतचे फिर्यादीचे तोंडी रिपोर्ट वरुन अपराध क्रमांक 746/2021 कलम 302, 394, 34 भादवी. सहकलम 4,25 शस्त्र अधिनियम 1959 प्रमाणे गुन्हा दाखल करुन तपासात घेण्यात आला होता.
             पोलीस स्टेशन चिखली येथे गंभीर खुनाचा, जबरी चोरीचा गुन्हा दाखल होताच  अरविंद चावरिया जिल्हा पोलीस अधिक्षक बुलडाणा,  बजरंग बनसोडे अपर पोलीस अधिक्षक,  सचिन कदम -उपविभागीय पोलीस अधिकारी बुलडाणा यांनी घटनास्थळाला भेट देवुन यांचे मार्गदर्शन व निर्देशाच्या अनुषंगाने गुन्हयाचा तपास  पोलीस निरीक्षक अशोक ना.लांडे ठाणेदार व सपोनि अमोल बारापात्रे पोस्टे. चिखली यांनी सुरु केला. गुन्हयाच्या तपासात पोलीस स्टेशन चिखली, स्थानिक गुन्हे शाखा बुलडाणा, सायबर पोलीस स्टेशन बुलडाणा येथील अधिकारी व अंमलदार यांचे एकुण 7 तपास पथके तयार करण्यात आले.  तपास पथकाच्या मदतीने रेकॉर्डवरील गुन्हेगार, गोपनिय बातमीदार, भौगोलीक परिस्थीती व तांत्रिक पुराव्याच्या आधारे गुन्हयाचा सखोल व बारकाईने तपास करण्यात आला.या अश्याचे पध्दतीचा वापर करुन पो. स्टे. देऊळगाव राजा अप. 467/2021 क 394, 34 भादवि प्रमाणे गुन्हा दि.3/11/2021 रोजी नोंद झाला होता. गुन्हयातील आरोपीतांचे वर्णन साम्य असल्याने देऊळगाव राजा तपास पथक पो.नि.जयवंत सातव ,पोउपनि किरण खाडे यांचे पथकासह तपास सुरु करण्यात आला. गोपनिय माहीतीच्या आधारे देऊळगाव मही, धोत्रा नंदाई गावात कोंबीग ऑपरेशन राबविण्यात येऊन आरोपी  राहुल किसन जायभाये वय 23 वर्ष रा. देऊळगांवमही ता. देऊळगांव राजा, राहुल अशोक बनसोडे वय 20 वर्ष रा. धोत्रा नंदई ता. देऊळगांवराजा, नामदेव पंढरीनाथ बोंगाणे वय 20 वर्ष रा. धोत्रा नंदई ता. देऊळगांवराजा यांना  25 नोव्हेंबर 2021 रोजी गुन्हयात अटक करण्यात आली. सदर गुन्हयातील अटक आरोपींना तपास दरम्यान चौकशी केली असता त्यांनी सांगितले की, यातील आरोपी राहुल किसन जायभाये हा सहा महिन्यापुर्वी आनंद इलेक्ट्रॉनिक्स दुकानात होम थेटर घेण्यासाठी आला होता होमथेटरच्या किंमतीवरुन त्यावेळेस आरोपी व कमलेश पोपट यांचे वाद झाले होते व आरोपी याने मृतक कमलेश पोपट यांचेमध्ये वाद झाल्यानंतर मृतक कमलेश पोपट याने आरोपी राहुल जायभाये यास भिकारडया तुझी औकात नसेल तर घेतो कशाला, वस्तुची किंमत कशाला करतो असे म्हणुन आरोपीच्या आई वडीलांवरुन शिव्या दिल्या होत्या. तसेच आरोपी राहुल जायभाये चे वडील एका महीन्यापुर्वी मयत झाले असुन कमलेश पोपट यांचा जुन्या घटनेचा राग डोक्यात ठेवुन त्यांना धडा शिकवण्याचा कट आरोपींनी रचुन हत्या केली.
             सदर गुन्हयाचे तपास मध्ये पोनि. अशोक ना. लांडे, ठाणेदार पोलीस स्टेशन चिखली, यांचेसह पो. नि. स्थागुशा बुलडाणा, पो.नि. सायबर पोलीस स्टेशन, पोनि. जयवंत सातव पोलीस स्टेशन देऊळगांवराजा, सपोनि. अमोल बारापात्रे, सपोनि. प्रविण तळी,सपोनि दुधाळ, सपोनि. विलासकुमार सानप, सपोनि.दत्तात्रय वाघमारे, पोउपनि. किरण खाडे, पोउपनि. निलेश शेळके, पोउपनि. धनंजय इंगळे, पोउपनि. श्रीकांत जिंदमवार, पोउपनि. श्रीराम व्यवहारे, पोउपनि. सचिन चौहान, सफौ. अशफाक शेख, सफौ. अकील काझी, पोहेका सुधाकर काळे, पोहेका शरद गिरी, पोहेका निवृत्ती चेके, पोहेका अताउल्ला खान, पोहेका शशीकांत धारकरी, पोहेका शेळके, पोहेका श्रावण गोरे, नापोका राजु आडवे, नापोका सदानंद चाफले, नापोका माधव कुटे, नापोका गणेश पाटील, नापोका डिगांबर कपाटे, नापोका दिनेश बकाले, नापोका युवराज राठोड, नापोका सुनिल रिंढे, नापोका कडुबा मुंढे, नापोका. सुनिल खरात, नापोकॉ. पुरुषोत्तम आघाव, पोकॉ. उमेश राजपुत, पोकॉ. शिवानंद तांबेकर, नापोकॉ. विजय किटे, पोकॉ. सुनिल राजपुत, पोकॉ.अजय इटावा, पोकॉ. विजय सोनोने, पोकॉ. कैलास ठोंबरे, पोकॉ. पंढरीनाथ मिसाळ, पोकॉ.निलेश उर्फ राजु मोरे, पोकॉ. रुपेश जोरवार, पोकॉ. शिवशंकर कायंदे, नापोका लक्ष्मीकांत इंगळे, मपोका. मंजुषा चिंचोले, मपोका. पंचशिला ससाणे, मनिषा मोरे, अर्चना सरदार यांनी विशेष परिश्रम करुन सदर गंभीर गुन्हा उघडकीस आणला आहे.