साखरखेर्डा येथून चोरी गेलेल्या गॅस वेल्डींग सिलिंडर चा वापर स्टेट बँकेत चोरी करण्यासाठी वापर

साखरखेर्डा येथून  चोरी गेलेल्या  गॅस वेल्डींग सिलिंडर चा वापर स्टेट बँकेत चोरी करण्यासाठी वापर
सिंदखेडराजा (एशिया मंच वृत्त : मंगेश राजगुरु) 
    तालुक्यातील  साखरखेर्डा येथील  बसस्थानका नजीक असलेल्या सोहेल गॅस वेल्डींग या दुकानातून २८ ऑक्टोंबर च्या रात्री १० हजार किंमतीचे दोन गॅस वेल्डींग सिलेडर ची चोरी झाली होती.
   या घटनेची  दुकान मालकाने रितसर तक्रार साखरखेर्डा पोलीस स्टेशन ला दाखल केली होती.
या तक्रारी नुसार ठाणेदार जितेंद्र आडोळे यांच्या मार्गदर्शनाखाली कसून तपास सुरु केल्यानंतर २२ नोव्हेंबर ला ४ आरोपींना पकडण्यात पोलीसांना यश आले.
     आरोपीमध्ये नायगाव बु! येथील तिन आरोपी नामे अक्षय गजानन अंभोरे वय २२, शिवाजी सखाराम गायकवाड वय ४२, चंद्रसिंग नरसिंग खुर्दे वय ४५, तर शिवाजी हरिचंद्र देशमुख वय३२ रा. लोणी या चौघांना साखरखेर्डा पोलिसांनी अटक केली आहे.
     दरम्यान प्राथमिक चौकशी मध्ये सदर आरोपीनी चोरलेल्या गॅस सिलेडरचा वापर केळवद मधील स्टेट बँकेत चोरी करण्यासाठी केला 
     या प्रकरणी आधिक तपास साखरखेर्डा पोलिस स्टेशन चे ठाणेदार जितेंद्र आडोळे यांच्या मार्गदशनाखाली पोहेकाँ रामदास वैरागे, पोहेकाँ पांडूरंग चौगुले करत आहेत.