मेहकर : (एशिया मंच वृत्त)
आखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव ह्यांनी 23 नोव्हेंबर रोजी जानेफळ पोलीस स्टेशनला भेट दिली. यावेळी त्यांचे शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आले. ह्याप्रसंगी जानेफळ पोलीस स्टेशनचे ठाणेदार राहुल गोंधे ,अनिसचे जिल्हाध्यक्ष किशोरभाऊ वाघ, तालुकाध्यक्ष कृष्णा हावरे सर, सामाजिक कार्यकर्ते गिरीश शेळके, अखंड झेप चे संपादक तथा बहुजन नेते रवींद्र वाघ, कृष्णा हावरे, पत्रकार विष्णु वाघ, जमादार डवळे, गोंड साहेब, अरसोडे व कर्मचारी उपस्थित होते. सोबतच यावेळी चळवळीबाबत चर्चा करण्यात आली.रवींद्र वाघ व पत्रकार विष्णू वाघ यांनी विचारलेल्या प्रश्नांना रोकठोक उत्तरे दिली.
