राजर्षी शाहू परिवाराचे उद्या मोफत नेत्र तपासणी शिबीर

राजर्षी शाहू परिवाराचे उद्या मोफत नेत्र तपासणी शिबीर
बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
    राजर्षी शाहू ग्रामीण सहकारी पतसंस्था शाखा देऊळघाट तसेच संजीवनी नेत्रालयाच्यावतीने २७ नोव्हेंबर रोजी मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. पळसखेड नागो येथे सकाळी ९ ते १२ दरम्यान हे शिबीर होणार आहे. शिबिराचे उदघाटन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सचिव तथा जि. प. सदस्य जयश्रीताई शेळके यांच्या हस्ते होणार आहे. प्रसिद्ध नेत्रतज्ञ डॉ. राहुल बाहेकर, डॉ. प्रीती बाहेकर रुग्णांची तपासणी करणार आहेत. परिसरातील नागरिकांनी शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.