युनिक फाऊंडेशन अ‍ॅपने होणार विदयार्थ्यांच्या उज्वल भविष्याची पायाभरणी- डॉ.सुकेश झंवर

युनिक फाऊंडेशन अ‍ॅपने होणार विदयार्थ्यांच्या उज्वल भविष्याची पायाभरणी- डॉ.सुकेश झंवर
बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
    स्थानिक युनिक अ‍ॅकेडमी ऑफ फाऊंडेशन द्वारे संचालित ‘युनिक फाऊंडेशन’ अ‍ॅपचे उद्घाटन बुलडाणा अर्बनचे चिफ मॅनेजिंग डायरेक्टर डॉ.सुकेश झंवर यांच्या हस्ते तसेच बायोलॉजी विषचे अनुभवी व तज्ञ शिक्षक डॉ.साहेबराव भालके व अ‍ॅकेडमीचे पालक प्रतिनिधी अनिल रिंढे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. NEET, IIT व् JEE, MHT-CET परिक्षांच्या फाऊंडेशन कोर्सचे दर्जेदार शिक्षण देणाऱ्या युनिक अ‍ॅकेडमीच्या वैशिष्ट्यांमध्ये या अत्याधुनिक अ‍ॅपची भर पडली आहे. हे अ‍ॅप गुगल प्ले स्टोअरवरुन डाऊनलोड करुन वर्ग ७ वी पासूनच विद्यार्थी फिजीक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि मॅथेमिटिक्स मिळून एकूण NEET, IIT व् JEE परिक्षेचे ५० हजार पर्यंत मल्टिपल चॉईस क्वेस्चन्स (एमसीक्यू) पध्दतीचे प्रश्न सहज सोडवू शकतात, अशी माहिती अ‍ॅकेडमीचे संचालक प्रा. गणेशराव देशमुख यांनी दिली. या अ‍ॅपमुळे विद्याथ्र्यांना खूप फायदा ओईल आणि परिक्षेची भिती कमी होईल, असे मत डॉ.सुकेश झंवर यांन आपल्या मार्गदर्शनपर भाषणात व्यक्त केले. पुढे बोलतांना त्यांनी ही अ‍ॅप विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्याची पायाभरणी करणारी असून विद्यार्थ्यांनी भविष्यात पैसा कमावतांना नितिमत्ता सोडू नये आणि पालकाचे स्वप्न पूर्ण करावे, असे सांगितले.
        डॉ.भालके म्हणाले की, विद्यार्थ्यांनी वेळ आणि ऊर्जा यांचे योग्य नियोजन कसे करावे याबाबत सखोल मार्गदर्शन केले. अनिल रिंढे यांनी युनिक अ‍ॅकेडमीमुळे त्यांच्या मुलाच्या अभ्यासात जाणवणारा फरक सांगितला आणि या अ‍ॅपचा निश्चित फायदा विद्यार्थ्यांना होईल, असे सांगितले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अ‍ॅकेडमीचे शिक्षकवृंद शशिकांत दांडगे, अमोल बावणे, आनंद गिते, अनुप्रीत घोडकी, अंकित सुर्यवंशी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला सर्व विद्यार्थी, पालक व प्रतिष्ठीत मान्यवर उपस्थित होते.