मोटार वाहन कायद्यान्वये फॅन्सी नंबर प्लेटवर कारवाई
बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांनी 2 नोव्हेंबर रोजी आढवा बैठक घेऊन बुलडाणा जिल्हयातील सर्व पोस्टे प्रभारी अधिकारी तसेच प्रभारी अधिकारी जिल्हा वाहतुक नियंत्रण शाखा बुलडाणा यांना संपूर्ण जिल्हयामध्ये वाहनांवर फॅन्सी नंबर प्लेट, कर्कश आवाजाचे सायलेन्सर चालविणारे वाहने, अवैध प्रवासी वाहतुक, ट्रिपल सिट तसेच मोटार वाहन कायद्यान्वये जास्तीत जास्त केसेस करण्याबाबत आदेशीत केले होते. त्यानुसार अपर पोलीस अधीक्षक खामगाव श्रावण दत्त व अपर पोलीस अधीक्षक बुलडाणा बजरंग बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली - 03 ते 18 नोव्हेंबर 2021 रोजी दरम्यान संपुर्ण जिल्हयामध्ये मोटार वाहन कायद्याअंतर्गत केसेस करीता विशेष मोहिम राबविण्यात आली. सदर मोहिमे मध्ये जिल्हयातील सर्व ठाणेदार, प्रभारी अधिकारी जिल्हा वाहतूक नियंत्रण शाखा, बुलडाणा हे स्वतः त्यांच्या अधिनस्त अधिकारी व अंमलदार यांचेसह सहभागी झाले होते. त्यामध्ये 108 फॅन्सी नंबर प्लेटवर 108000 रूपये दंड, 735 ट्रिपल सिटवर 147000 तसेच 10 कर्कश हॉर्न व सायलेन्सरवर 10000 , 3455 विना लायसन्स वाहन चालविणे 691000 असे विविध प्रकरणी 1579000 रूपय1 दंड लावण्यात आले. लावण्यात आलेल्या दंडापैकी 555800/- रुपये इतका दंड वाहन धारकांकडुन वसुल करण्यात आला. तसेच उर्वरीत दंडाची रक्कम ही अनपेड़ स्वरुपात आहे. तरी सर्व वाहन धारकांना कळविण्यात आले. की आपल्या वाहनांवर करण्यात आलेल्या केसेस संदर्भात आपणास प्राप्त एसएमएस नुसार तात्काळ सदरचा दंड जवळच्या वाहतुक अंमलदार यांचेकडे जाऊन भरणा करण्यात यावा अथवा आपणास पाठविण्यात आलेल्या एसएमएस मध्ये ऑनलाईन पैसे भरण्या संदर्भात जी लिंक पुरविण्यात आलेली आहे. त्याच्यावर क्लीक करुन ऑनलाईन पैसे वाहन धारक भरु शकतात. यापुढेदेखील अशा स्वरुपाची मोहिम नियमितपणे राबविण्यात येणार आहे. तरी सर्व वाहन धारकांनी नियमांचे पालन करून पोलीसांना योग्य ते सहकार्य करण्याचे बुलडाणा जिल्हा पोलीस दलातर्फे आवाहन करण्यात आले.
