* तुपकरांच्या आंदोलनाला हिंसक वळण
बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी गेल्या तिन दिवसांपासून त्यांच्या चिखली रोडवरील निवासस्थानासमोर अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. त्यांच्या समर्थनार्थ शुक्रवार 19 नोव्हेंबर रोजी कार्यकर्त्यानी जिल्हाभर रास्तारोको आंदोलन केले. दरम्यान आज सायंकाळी 5.30 वाजेच्या दरम्यान स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ता रविकांत तुपकर यांचे समर्थक शेख रफिक (वय 50 ) यांनी अचानक अंगावर डिजल शिपडून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला मात्र वेळीच उपस्थित असलेले पोलीस धावून आल्याने त्यांचा तो प्रयत्न अयशस्वी ठरला.
स्वाभीमानीच्या कार्यकर्त्यानी पोलीसांचे वाहन फोडले : गेल्या तिन दिवसांपासून सुरू असलेल्या स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या अन्नत्याग आंदोलनाला आज 19 नोव्हेंबर रोजी हिंसक वळण लागले. आज संध्याकाळी 6 वाजे दरम्यान आंदोलनस्थळी पोहचलेल्या पोलीसांच्या वाहनावर स्वाभीमानीच्या काही कार्यकर्त्यानी दगडफेक केली. यात पोलीसांच्या वाहनाचे नुकसान झाले. याचवेळी काही कार्यकर्त्यानी अॅम्बुलन्सही फोडली.
