महात्मा ज्योतिबा फुले यांचे विचार सर्वांसाठी प्रेरणादायी : गटशिक्षणाधिकारी संजय पवार

महात्मा ज्योतिबा फुले यांचे विचार सर्वांसाठी प्रेरणादायी : गटशिक्षणाधिकारी  संजय पवार 
बुलडाणा :  (एशिया मंच वृत्त)
       महात्मा फुले यांचे शिक्षण हे कृतीयुक्त होते, त्यांच्या विचारांचा वारसा जोपासण्याचा आम्ही अल्पसा प्रयत्न आहे, असे प्रतिपादन महात्मा फुले मंडळाचे अध्यक्ष सुभाष मानकर यांनी केले. गटशिक्षणाधिकारी संजय पवार म्हणाले की, महात्मा फुले यांचे विचार सर्वांसाठी प्रेरणादायी आहेत.
 आज महात्मा फुले मंडळ बुलडाणा व महात्मा ज्योतिबा फुले शाळेच्या वतीने महात्मा फुले यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महात्मा फुले मंडळाचे अध्यक्ष सुभाष मानकर हे होते तर , सत्कार मूर्ती गटशिक्षणाधिकारी संजय पवार, दिव्य मराठीचे जिल्हा प्रतिनिधी लक्ष्मीकांत बगाडे , मान्यवरांनी सर्वप्रथम दीप प्रज्वलित करून क्रांतिसूर्य महात्मा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण केले. यावेळी गटशिक्षणाधिकारी संजय पवार यांचा शाल व बुके देऊन सत्कार महात्मा फुले मंडळाचे अध्यक्ष सुभाष मानकर यांनी केला. लक्ष्मीकांत बगाडे यांचा शाल व बुके देऊन सत्कार महात्मा फुले मंडळाचे माजी अध्यक्ष पी .सी .चौधरी यांनी केला. शाळा समितीचे अध्यक्ष प्रकाश वानेरे यांनी महात्मा फुलेंचे स्मरण दररोज करावे व त्यांच्या विचारातून शिक्षणाची ध्येय गाठावे असे मार्गदर्शन केले. 
लक्ष्मीकांत बगाडे यांनी महात्मा फुले यांच्या प्लेग काळातील कार्याची  आठवण करवून दिली, तर संजय पवार यांनी महात्मा फुले शाळा म्हणजे शहरातील आदर्श शाळा असून महात्मा फुले यांचे आचार-विचार व कार्य या ठिकाणी प्रत्यक्षात पाहायला मिळतात याचा मला खूप आनंद झालेला आहे .शैक्षणिक कार्यात शाळेला मदत सर्वपरी करता येईल तेवढी पंचायत समितीच्या वतीने करण्यात येईल असे आश्वासन दिले. महात्मा फुले मंडळाचे अध्यक्ष सुभाष मानकर सर यांनी महात्मा फुले यांच्या विविध ग्रंथ कार्य व महात्मा फुले शाळेचे ध्येय ,धोरण विद्यार्थी शिक्षक ,पालक यांची सविस्तर माहिती दिली. 
     शाळेच्या मुख्याध्यापिका स्नेहलता मानकर यांनी गटशिक्षणाधिकारी संजय पवार व केंद्रप्रमुख पुरुषोत्तम सोनुने यांचा शाळेच्या वतीने सत्कार केला. या कार्यक्रमाला  पल्हाडे , इंजिनीयर सुरेश चौधरी,   ,पर्यवेक्षक नरेश पेदे , प्रभारी मुख्याध्यापक पंकज राठोड या मान्यवरांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेशसिंग जाधव, आभार प्रदर्शन संदीप हुडेकर, आयोजन रमाकांत कमळकर व विशेष सहकार्य शोभा राऊत योगेश सातव, अमोल राजपूत यांनी केले.