प्रियकरानेच केला प्रेयसीचा खून
* खरबडी शिवारातील घटना
बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
बुलडाणा जिल्ह्यातील मोताळ्यातील खरबडी शिवारात एका महिलेची हत्या झाल्याची घटना 30 नोव्हेंबर रोजी समोर आली आहे. दरम्यान पोलिसांकडून आरोपीला अटक करण्यात आली असून तो मृतक महिलेचा प्रियकर असल्याची प्राथमिक माहिती आहे. सदर घटनेबाबत मिळालेली माहिती अशी की, मागील चार वर्षांपासून एकत्रित राहत असलेल्या पंचफुलाबाई शंकर येखनार (वय 36) आणि तिचा प्रियकर गजानन गणेश सोनोने (वय 40) यांच्यात काल कडाक्याचे भांडण झाले. या भांडणात गजाननने पंचफुलाच्या डोक्यात दगड मारला. रक्तस्राव होऊन तिचा जीव गेला. ही घटना खरबडी येथील नाफडे यांच्या शेतात घडली. या शेतात दोघे सोबत राहायचे. बोराखेडी पोलिसांनी आरोपी गजाननला अटक केली आहे. त्याच्याविरोधात कलम 302 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीएसआय अनिल भुसारी पुढील तपास करीत आहेत.
