बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
शहरातील जुना अजिसपुर रोड मार्गावर नवीन ब्रेझा कंपनीची कार अचानक अनियंत्रित होऊन एक बालक जखमी झाला ही घटना रविवारी सकाळी 10.30 वाजे दरम्यान घडली.
या घटनेबाबत मिळालेली माहिती अशी की, खूपगाव येथील शिक्षक सतीश जाधव यांनी तीन दिवसांपूर्वीच ब्रेझा कंपनीची नवीन कार घेतली होती आज सकाळी आपल्या बारा वर्षीय मुलासोबत ते कारमध्ये बसून समता नगरकडे जात होते. यावेळी जुना अजिसपुर रोड मार्गावर स्थित डॉक्टर पिंपरकर यांच्या दवाखान्याजवळ कार एका बोरला घासली यावेळी कारचा वेग कमी होता मात्र कार घासण्याची माहिती मिळाल्याने चालक जाधव अचानक गोंधळून गेले व ब्रेक दाबण्याचे ऐवजी त्यांचा पाय एक्सलेटर वर पडला. यामुळे कार अक्षरशा उसळली आणि अनियंत्रित होऊन डॉक्टर पिंपरकर यांचा दवाखाना जवळ असलेल्या एका झाडावर धडकली. या धडकेत कारचे मोठे नुकसान झाले तर कारमध्ये मागे बसलेला त्यांचा 10 वर्षीय मुलगा एकदम समोरून पडला. त्यामुळे त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. काही कळण्याच्या आतच ही घटना घडल्याने नेमके काय झाले हे कोणाला लक्षात आले नाही मात्र जेव्हा मुलगा जोर जोरात रडत होता तेव्हा आजूबाजूच्या लोकांनी तत्काळ धाव घेत मुलाला गाडीतून बाहेर काढले आणि दवाखान्यात भरती केले. सध्या दोन्ही पिता पुत्राची तब्येत चांगली असल्याची माहिती मिळाली आहे
बोगस निघाल्या एअर बॅग :
वाहन चालकाच्या सुरक्षेसाठी अलीकडे दर्जेदार वाहनांमध्ये मोठ्या प्रमाणात एअर बॅग बसवल्या जातात. या एअर बॅग ची जाहिरात ही कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणात केली जाते. अचानक अपघात झाल्यास वाहनात बसलेल्या नागरिकांना जास्त दुखापत होऊ नये यासाठी या एअरबॅग असतात मात्र जाधव यांनी घेतलेल्या ब्रेजा कार मधील एअर बॅग अतिशय बोगस निघाल्यात. टक्कर लागल्यानंतर या एअरबॅग झपाट्याने समोर आल्यात मात्र समोर असलेल्या दोन्ही एअरबॅग वाहनात बसलेल्या एकाही व्यक्तीस सुरक्षा देऊ शकल्या नाही. दुर्घटनेनंतर तपासणी केली असता परिसरातील नागरिकांनी एअर बॅग अतिशय बोगस असल्याच्या तक्रारी केल्या.
