पत्रकार शाम देशमुख  राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्काराने सन्मानित
* राष्ट्रीय पत्रकार दिनी ज्येष्ठ पत्रकार यतीन देसाई यांचे हस्ते झाला गौरव
चिखली : (एशिया मंच वृत्त)
      देशभरातील पत्रकारांचे  संघटन असलेल्या ऑल जर्नलिस्ट अँड फ्रेंड सर्कलच्या वतीने अकोला येथे  दि.15 व 16 नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त राज्यस्तरीय पत्रकार संमेलन पार पडले. यावेळी राज्य भरातून पत्रकारांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
या दरम्यान या संघटनेच्यावतीने दरवर्षी पत्रकारांना विविध पुरस्कार प्रदान केले जातात. त्या  पुरस्कार वितरण सोहळयाचे आयोजनही यावेळी करण्यात आले होते. यावेळी बुलडाणा जिल्ह्यातून धोत्रा भनगोजी येथिल दै.देशोन्नतीचे पत्रकार तथा ऑल जर्नलिस्ट अँड फ्रेंड सर्कल या संघटनेचे जिल्हाध्यक्ष शाम देशमुख यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानमूर्ती चिन्ह व शाल श्रीफळ देऊन राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्काराने सम्मानित करण्यात आले.
      अकोला जिल्ह्यात कृषि पर्यटन केंद्र म्हणून प्रसिद्ध असलेल्या राधाकुंज कृषी पर्यटन केंद्र अंत्री येथील भव्यदिव्य सभागृहात पुरस्कार सोहळा वितरण करण्यात आला. याप्रसंगी जेष्ठ पत्रकार जतिन देसाई मुंबई, ऑल जर्नलिस्ट अँड फ्रेंड सर्कलचे केंद्रीय अध्यक्ष यासीन पटेल, प्रदेशअध्यक्ष अजिंक्य गोवेकर, अकोला निवासी उपजिल्हाधिकारी प्रा.संजय खडसे, बुलडाणा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष अरुण जैन,  गणेश कोळी, ऑल जर्नलिस्ट अँड फ्रेंड सर्कलच राज्य संपर्क प्रमुख नितिन गुंजाळकर,  जिल्हा सचिव रवींद्र फोलाने, सकाळचे चिखली येथिल बातमीदार विनोद खरे, गिरीश अवघडे पुणे, विश्वस्त दौलत चौथानी, संमेलन संयोजक  रोशन शेख, बाळासाहेब ठाकरे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. 
      चिखली  तालुक्यातील धोत्रा भनगोजी सारख्या ग्रामीण भागामधुन मागील अनेक वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात काम करत तालुक्यासह ग्रामीण भागातील विविध समस्यावर आपल्या लेखणीच्या माध्यमातुन उत्कृष्ट लिखाण करुण त्या प्रश्नाला वाचा फोडण्याचे काम पत्रकार शाम देशमुख यांनी केले आहे. त्याचबरोबर सामाजिक क्षेत्रात देखील त्यांचे चांगले योगदान असून त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना संघटनेच्यावतीने आदर्श पत्रकार हा  राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल शाम देशमुख यांचेवर सर्व  स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.