* शिबिरात दीडशेवर रुग्णांची तपासणी : रुग्णांना मोफत औषधीचे वाटप
बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सचिव तथा जि. प. सदस्य जयश्रीताई शेळके यांच्या पुढाकाराने २७ नोव्हेंबर रोजी पळसखेड नाईक येथे आयोजित मोफत नेत्र तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. नेत्रतज्ञ डॉ. राहुल बाहेकर, डॉ. प्रीती बाहेकर यांनी दीडशेवर रुग्णांची तपासणी केली. रुग्णांना आवश्यक औषधीचे वाटप करण्यात आले.
राजर्षी शाहू ग्रामीण सहकारी पतसंस्था शाखा देऊळघाट तसेच संजीवनी नेत्रालयाच्यावतीने पळसखेड नाईक येथे नेत्र तपासणी शिबीर घेण्यात आले. शिबिराचे उदघाटन जयश्रीताई शेळके यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी सरपंच मालतीताई राठोड होत्या. उपसरपंच हिरासिंग पवार, प्रदेश काँग्रेसच्या ओबीसी सेलचे सरचिटणीस भागवत वानेरे, ग्रा. पं. सदस्य पूजा इंगळे, प्रकाश राठोड, मुकुंदा राठोड, शुभांगी जाधव, बेबीताई राठोड यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलतांना जयश्रीताई शेळके म्हणाल्या की, दृष्टी असेल तर सृष्टी पाहता येते. त्यामुळे प्रत्येकाने डोळ्यांची काळजी घेतली पाहिजे. शाहू परिवाराच्या वतीने नेहमीच सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात. ग्रामीण भागातील नागरिकांच्या आरोग्यासंदर्भातील अडचणी लक्षात घेता नेत्र तपासणी शिबीर घेण्यात आले. जनतेच्या सेवेसाठी आम्ही कटीबद्ध आहोत. डॉ. राहुल बाहेकर म्हणाले, डोळे हा नाजूक अवयव आहे. नागरिकांनी डोळ्यांची काळजी घ्यावी. डोळ्यांच्या आजारास सहजपणे घेऊ नये. डोळ्याबाबत कुठलीही तक्रार असल्यास डॉक्टरांशी संपर्क साधावा. म्हणजे वेळेवर उपचार करता येतात. इतर मान्यवरांनीही विचार व्यक्त केले. त्यानंतर डॉक्टरांनी रुग्णांची नेत्र तपासणी केली. दीडशेवर रुग्णांची तपासणी करुन त्यांना औषधीचे वाटप करण्यात आले. शस्त्रक्रियेची आवश्यकता असलेल्या रुग्णांना पुढील उपचारामध्ये सवलत देण्यात येणार असल्याचे डॉ.राहुल बाहेकर यांनी सांगितले.
यावेळी श्याम राठोड, शरद सपकाळ, सुरेश चव्हाण, सुदर्शन राठोड, भुपेश जाधव, नितीन राठोड, प्रदीप राठोड, अनिल चव्हाण, विठ्ठल राठोड, सतिष राठोड, मधुकर राठोड, काशिनाथ पवार, इंदल चव्हाण, भगवान चव्हाण, दिलीप पवार, हरचंद राठोड, कैलास राठोड, अनिल राठोड, बाबुराव चव्हाण, अविनाश चव्हाण, प्रकाश राठोड, तोताराम पवार, शामराव गायकवाड, सुखदेव इंगळे, दलसिंग राठोड, बाळुभाऊ चव्हाण, वसंत चव्हाण, साहेबराव चव्हाण, जगदीश राठोड, दर्शन राठोड, सिताराम राठोड, विजय पवार, हरिदास जाधव, महावीर पवार, लक्ष्मण मानकर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
