* मुस्लिम समाज बांधवांचे दुकाने व प्रतिष्ठाने शतप्रतिशत बंद
बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
त्रिपुरा येथील अल्पसंख्याक मुस्लिम समुदायावर झालेल्या अत्याचाराची उच्च स्तरीय न्यायालीन चौकशी करण्याकरिता रजा अकॉडमी व तहफ्फुजे नामुसे रिसालत बोर्डच्या वतीने शुक्रवार 12 नोव्हेंबर रोजी स्वइच्छेने बंदचे आवाहन करण्यात आले होते. सदर बंदला जिल्ह्याभरातले व्यवसायीकांनी संमिश्र प्रतिसाद दिला असुन मुस्लिम बांधवांच्या दुकाने व प्रतिष्ठाने शतप्रतिशत बंद ठेवून जिल्हाधिकाऱ्या मार्फत राष्ट्रपतींना निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे कि, भारतीय राज्यघटनेच्या धर्मनिरपेक्षतेच्या मूलभूत तत्त्वांच्या उल्लंघन करू न त्रिपुरा राज्यमध्ये मुस्लिम अल्पसंख्याक समुदायावर अत्याचार करू न त्यांच्या घरे व प्रार्थनास्थळांची तोडफोड करू न जाळण्यात आली. या घटनेच्या निषेधार्थ रजा अकॉडमीच्या वतीने बुलडाणा जिल्हा स्वईच्छेने बंदचा आवाहन करण्यात आला होता. सदर बंदचे आवाहनाले संमिश्र प्रतिसाद दिसुन आला मात्र मुस्लिम बांधवांनी आपापल्या दुकाने प्रतिष्ठाने शंभर टक्के बंद ठेवून निषेध नोंदविला. शुक्रवारच्या विशेष नमाज नंतर रजा अकॉडमीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय समोरील धरणे आंदोलन करून शिष्टमंडाने जिल्हाधिकारी मार्फत राष्ट्रपतींना निवेदन देण्यात आले. रजा अॅकॉडमीच्या बंदला एमआयएम आणि आॅल इंडिया जमियातुल कुरैशच्या वतीने लेखी पत्र देवून पाठिंबा दिला.
उच्चस्तरीय न्यायालयीन चौकशीची मागणी
जिल्हाधिकारी यांच्या मार्फत राष्ट्रपतींना सादर केलेल्या निवेदनात, रजा अॅकॅडमीने सदर घटनेची उच्चस्तरीय न्यायालीन समिती स्थापन करून त्रिपुरा राज्यातील हिंसाचाराची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. सोबतच दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशीही मागणी केली. जिल्हाधिकारी यांना निवेदन देतेवेळी रजा अॅकॅडमीचे जिल्हा सचिव रईसोदीन काझी, जिल्हा प्रसिध्दी प्रमुख शेख नदीम, शहराध्यक्ष सय्यद समीर, जुबेर शेख, कारी कलीम रिजवी, हाफिज कमरूज्जमा रिजवी आदींसह रजा अॅकॅडमीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
