मुख्यमंञी उध्दव ठाकरे यांचे सरकार म्हणजे आलीबाबा चाळीस चोर* माजी खासदार किरीट सोमया यांचा आरोप

मुख्यमंञी उध्दव ठाकरे यांचे सरकार म्हणजे आलीबाबा चाळीस चोर
*  माजी खासदार किरीट सोमया यांचा आरोप
बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
       गेल्या 27 महिन्यामध्ये महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारने घोटाळयांचा व भ्रष्टाचाराचा कळस गाठला आहे. अनेक मंञी घोटाळयात अडकले
आहेत. त्यापैकी अनेक जण जेलची हवा खात असून अनेक मंञी चौकशीच्या भव-यात अडकले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात ज्या उध्दव ठाकरे यांच्या
नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सरकार सत्ता भोगत आहेत ते मुख्यमंञी उध्दव ठाकरे हे आलीबाबा चाळीस चोरांचे मुखीया असल्याचा घणाघाती आरोप भाजपाचे
माजी खासदार किरीट सोमया यांनी पञकार परिषदेत केला.
       बुलडाणा येथील  स्थानिक भाजपा जनसंपर्क कार्यालयात आज 12 नोव्हेंबर 2021 रोजी आयोजित
पञकार परिषदेत ते बोलत होते. नुकत्याच बुलडाणा अर्बन येथे झालेल्या आयकर विभागाच्या तपासणी नंतर सत्यता पडताळण्यासाठी किरीट सोमया यांचा बुलडाणा
जिल्हा दौरा जाहिर झाला होता. त्याअनुषंगाने या पञकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. पुढे बोलतांना ते म्हणाले की, येत्या 31 डिसेंबर
पर्यंत महाराष्ट्रातील चाळीस बढया नेत्यांचे घोटाळे आपण बाहेर काढणार आहोत. महाराष्ट्राला घोटाळे  मुक्त करण्याचा आपला अजेंडा असून त्यादृष्टीने माझे काम सुरु असल्याची कबुलीही त्यांनी यावेळी दिली.
       औरंगाबादचे शिवसेना नेते अर्जुनराव खोतकर यांच्या कारखान्यासंदर्भात आणि त्यांच्या कारखान्यातील दोन बेनामी फायनंन्स पार्टनर तापडीया आणि मुळे
यांच्या कारभाराची चौकशी करण्याची आपली मागणी आहे. लातुर बॅंके संदर्भात कारवाईसाठी आम्ही कागदपञ जमा केले असून त्यासंदर्भात लवकरच कारवाई सुरु होईल. आमचा मुळ हेतु हा राजकारणातील भ्रष्ट्राचार उघडकीस आणून संबधीतांविरुध्द कारवाई करुन सरकारला त्यांच्या विरुध्द कारवाईस करण्यास
भाग पाडणे हा आहे. पेट्रोल-डिझेल च्या भावासंदर्भात भाजपाने आंदोलन केली आहेत. परंतु सध्याच्याकाळात पेट्रोलच्या एक लिटर मागे उध्दव ठाकरे सरकार
30 रुपये टॅक्स वसुल करते, तर मोदी सरकार हे त्यापेक्षा कमी घेते. महाराष्ट्रातील सरकारने टॅक्स कमी केल्यास ग्राहकांना 79 रुपये लिटर किंमतीने पेट्रोल मिळेल असे त्यांनी सांगितले. एसटी कर्मचा-यांचे आंदोलन सुरु आहे. एसटी कर्मचा-यांना आत्महत्या करण्यास भाग पाडतात. पगार देत नाहीत, जेल मध्ये टाकत आहेत, नोकरीवरुन काढून टाकत आहेत. माञ महाराष्ट्रातले मंञी भ्रष्टाचारात गुंग असल्याचा आरोपही त्यांनी केला. या
पञकार परिषदेला भाजपाचे जिल्हाध्यक्ष अॅड.आ. आकाश फुंडकर, प्रदेश प्रतिनीधी माजी आमदार विजराज शिंदे, बुलडाणा विधानसभा प्रमुख योगेंद्र
गोडे, भाजपा सरचिटणीस संतोषराव देशमुख, मोहन शर्मा, सुनिल देशमुख, शहरअध्यक्ष सिध्दार्थ शर्मा, भाजपा महिला आघाडीच्या सिंधुताई खेडेकर,
मंदाताई कंकाळ यासह भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते.

बुलडाणा अर्बन संदर्भात समाधानी
      बुलडाणा अर्बन क्रेडीट सोसायटी संदर्भात मला जी माहिती हवी होती, ती त्यांनी मला दिली. मला जे प्रकरण समजून घ्यायच होत, ते त्यांनी सांगितल. त्यामुळे माझं समाधान झाले असल्याचे  यावेळी माजी खासदार किरीट सोमया यांनी सांगितले.