टिपू सुलतान जयंती निमित्त 60 जनांणी केले रक्तदान * ज्यांनी एकाचा जीव वाचविला त्यांनी जगाचा जीव वातविला या उपदेशानुसार रक्तदान शिबिराचे आयोजन : शेख सईद

टिपू सुलतान जयंती निमित्त 60 जनांणी केले रक्तदान 
* ज्यांनी एकाचा जीव वाचविला त्यांनी जगाचा जीव वातविला या उपदेशानुसार रक्तदान शिबिराचे आयोजन : शेख सईद
बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
     बुलडाणा शहरातील मिर्झा नगर येथील माशा अल्लाह हेल्थ क्लबच्या वतीने शेर ए मैसूर हजरत टिपू सुलतान जयंती निमित्त 20 नोहेंबर रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरामध्ये 60 रक्तदात्यांनी रक्तदान केले. रक्तदान शिबिराची सुरुवात माशा अल्लाह हेल्थ क्लब चे अध्यक्ष शेख सईद यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जमात ए इस्लामीचे जिल्हा उपाध्यक्ष मौलाना मुजाहिद, पत्रकार असरार देशमुख, फला ए आम ट्रस्ट चे तौसीफ खान, हाजी शेख सलीम, लुकमान कुरेशी, मुझफर शेख हारुन चौधरी, आसीफ सौदागर हे उपस्थित होते. यावेळी रक्तदात्यांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. रक्त संकलन करण्यासाठी जीवनधारा रक्तपेढी चे जनसंपर्क अधिकारी अनील जाधव, महेश भक्कड, सौरभ बोचरे, अजय जाधव, दांडगे उपस्थित होते. माशा अल्लाह सोशल क्लब हे गेल्या 15 वर्षापासून बुलडाणा शहरातील आठवाडी बाजारात उन्हाळ्यात पानपोई, पुर्ण वर्षाभर अन्नदान, गर्जुना उबदार कपडे, हिवाळ्यत ब्लँकेट वाटप, आणि आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिराचे आयोजन करत आहे.         रक्तदानाच्या माध्यमातून हे रक्त दान शिबीर घेण्यात येते.
 ज्या रुग्णांना रक्ताची गरज लागते त्यांना ही सेवा मोफत दिली जाते. वाढती रुग्ण संख्या पाहता आज सर्वात जास्त प्रमाणात रुग्णांना रक्ताची गरज भासत आहे. हीच गरज ओळखून सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून आपणही समाजाचे काहीतरी देणे लागतो या विचारातून मंडळाच्या माध्यमातून दरवर्षी हे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येत असून या माध्यमातून समाजसेवा करण्याचे काम माशा अल्लाह हेल्थ क्लबच्या माध्यमातून केले जाते. रक्तदान शिबिर यशस्वी करण्याकरिता माशा अल्लाह हेल्थ क्लब चे शेख सोहीद, शेख बब्लू, शेख सोहिल,शेख आमीर, सहीत क्लब चे सदस्य यांनी परिश्रम घेतले.