बुलडाणा येथील हैदरशाह हिराशाह उर्फ अली यांना राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्काराने सन्मानित

बुलडाणा येथील हैदरशाह हिराशाह उर्फ अली यांना राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्काराने सन्मानित 
बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
      येथील शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या हैदरशाह हिराशाह उर्फ अली या युवकाला 2021 चा उडान फाउंडेशन बुलडाणा द्वारा राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार भानुदास चव्हाण हॉल औरंगाबाद येथे शुक्रवार  19 नोव्हेंबर 2021 रोजी महाराष्ट्राच्या माजी मंत्री तथा राज्यसभेच्या खासदार फौजियाखान, राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक प्रदेश अध्यक्ष ऍड. मोहम्मद खान पठाण , तसेच उडान फाउंडेशनचे अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक प्रदेश उपाध्यक्ष प्रा. रिझवान खान, औरंगाबाद विभागाचे शिक्षक आमदार  विक्रमजी काळे, उडान फाउंडेशनचे सचिव  विशाल गुजर, सेलेब्रिटी मयुरी ठाकरे या मान्यवरांच्या शुभ हस्ते हैदरशाह उर्फ अली यांना हा राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
      हैदरशाह उर्फ अली हे जळगांव जिल्ह्यातील  जामनेर तालुक्यातील वाकडी या गावाचे मुळ रहिवाशी आहेत परंतु बुलडाणा जिल्ह्यातील धामणगाव बढे येथील मराठी माध्यमाच्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत त्यांचेे शिक्षण झाले , तसेच शासकीय अध्यापक महाविद्यालय , बुलडाणा येथे हैदरशाह उर्फ अली यांनी बी.एड चे प्रशिक्षण पूर्ण केले आणि तेव्हा पासून ते बुलडाणा येथेच स्थायिक झाले.
     म्हणतात ना मुलाचे पाय पाळण्यात दिसतात असेच अली च्या बाबतीत दिसून येते, उर्दू, मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असलेल्या अली ला जातपात, धर्म न पाहता कोणालाही मदत करण्याची आवड बालपणापासूनच आहे. बुलडाणा येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये येणाऱ्यांना त्यांनी नेहमीच मदत केली. आता पर्यंत त्यांनी अनेकांना रक्तदान करून जीवदान देण्याचं पुण्यकाम सुद्धा अनेकदा केलं आहे. तसेच दर गुरुवारला बुलडाणा येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये चारशे, पाचशे लोकांना अन्नदान केल्या जाते. त्यावेळेस न चुकता हैदरशाह उर्फ अली हे सतत मदत करीत असतात. त्याच प्रमाणे कोरोना काळात सुद्धा सामाजिक भावनेतून आरोग्यदूता प्रमाणे सहकार्य केले.आता पर्यंत कोणत्याही प्रकारची मिडिया मध्ये प्रसिद्धी न देता ते गरजूंना ते सामाजिक बांधिलकी साधून मदत करतात. त्यांच्यातील हे गुण ओळखून उडान फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांना राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले.
     हा मानाचा पुरस्कार त्यांना मिळाल्या बद्दल विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, आई - वडील , गुरुजन यांनी चांगले संस्कार केल्यानेच हा मानाचा पुरस्कार प्राप्त झाला. कमी वयात मानाचा राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याने अली यांचं सर्वत्र कौतुक करण्यार येत आहे.