बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
गेल्या साठ वर्षाची धार्मिक परंपरा जोपासत चिखली तालुक्यातील धोत्रा भणगोजी येथे बंकट स्वामी भजनी मंडल व गावक-यांच्या वतीने दसरा सण उत्साहात साजरा करण्यात आला. हभप श्रीकृष्ण महाराज थोलबरे, हभप रामकृष्ण महाराज शितोले, हभप वाल्मिक महाराज कोईगडे, हभप प्रकाश महाराज मोरे यांच्या नेतृत्वात दरवर्षी वारकरी परंपरेनुसार गावातून दिंडी मिरवणूक काढून दसरा सण साजरा केला जातो. यामध्ये विश्वंभर हळदे , अशोकराव भोसले, प्रल्हाद कोईगडे, रघुनाथ नेमाने, अशोक शिंदे, वसंतराव बावस्कर,श्रीकृष्ण इंगळे, भास्करमामा पवळ, प्रकाशबुवा मोरे, ज्ञानेश्वर कोईगडे, नामदेव हळदे, तुळशीराम हळदे, दगडू यादव तसेच बंकटस्वामी भजनी मंडळ तथा समस्त गावकरी हजर होते.
