* काँग्रेसच्या प्रदेश सचिव जयश्रीताई शेळके यांची संकल्पना
बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
शासकीय कार्यालयातील सर्वसामान्य नागरिकांच्या प्रलंबित समस्या सोडविण्यासाठी काँग्रेसच्या प्रदेश सचिव तथा जि. प.सदस्य ॲड.जयश्रीताई शेळके यांच्या संकल्पनेतून यावर्षीच्या सुरुवातीपासून भूमिपुत्र अभियानाची सुरुवात करण्यात आली आहे. महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंतीचे औचित्य साधून 2 ऑक्टोबर रोजी झरी येथे घेण्यात आलेल्या भूमिपुत्र अभियानास उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.
सर्वसामान्य नागरिकांची शासकीय कागदपत्रांबद्दलची अडचण विचारात घेऊन ॲड.जयश्रीताई शेळके यांनी भूमिपुत्र अभियानाची संकल्पना मांडली. झरी येथे पार पडलेल्या अभियानात संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजना, जमिनविषयक, रेशनकार्ड तसेच इतर शासकीय योजनांसबंधी तक्रारी प्राप्त झाल्या. यापैकी अनेक तक्रारींचा जागेवरच निपटारा करण्यात आला असून काही समस्यांचा संबंधित शासकीय कार्यालयांमध्ये पाठपुरावा केला जाणार आहे. यावेळी ॲड.जयश्रीताई शेळके यांनी महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन करून भूमिपुत्र अभियानाची पार्श्वभूमी विषद केली. तसेच महिला बचत गटाविषयी मार्गदर्शन करून ग्रामीण भागातील समस्या सोडविण्यासाठी नेहमी तत्पर असल्याचे सांगितले. दरम्यान त्यांच्या हस्ते डिजिटल स्वाक्षरी मोहिमेंतर्गत शेतकऱ्यांना सातबारा वाटप करण्यात आले. गोपाल शेळके व पुरुषोत्तम राऊत यांनी संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजनाविषयक समस्यांवर मार्गदर्शन केले. तर विशाल अहेर यांनी रेशनकार्ड, आधारकार्ड संबंधी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला गावच्या सरपंच विद्याताई भुसारी, संदीप भुसारी, माजी शाळा समिती अध्यक्ष ज्ञानेश्वर नप्ते, दशरथ भुसारी, प्रकाश नप्ते, मनोहर पवार, महादू भुसारी, नामदेव भुसारी, विठ्ठल लिगोंडे, प्रकाश नप्ते,
भगवान भुसारी, गजानन लिंगोडे, श्रीकृष्ण तायडे, राजाराम भुसारी, गजानन भुसारी, श्रीकृष्ण भुसारी, संतोष पवार, गणेश भुसारी, ज्ञानदेव भुसारी, लक्ष्मण ताठे, संदीप इंगळे, विलास इंगळे, समाधान चव्हाण, सुधाकर चव्हाण, कमल लिंगोडे, जनाबाई भुसारी, कासाबाई भुसारी, सुनिता भुसारी, मीरा भुसारी,सविता तायडे, कांताबाई भुसारी, अंजनाबाई नप्ते, कुशिवर्ताबाई भुसारी, सुमनबाई भुसारी, सरुबाई भुसारी, तलाठी बबनराव ताठे साहेब, मुख्याध्यापक एकनाथ पाटील, सहाय्यक शिक्षक जिवन जाधव, अंगणवाडी सेविका विजया चव्हाण यांच्यासह अनेक गावकरी हजर होते.
जनता आणि प्रशासनातील दुवा साधणारे अभियान
भूमिपुत्र अभियान हे जनता आणि प्रशासन यांच्यातील दुवा साधणारे अभियान आहे. ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक त्या कागदपत्रांची जमवाजमव करताना खूप अडचणींचा सामना करावा लागतो. अनेक कार्यालयांच्या चकरा माराव्या लागतात.एवढे करूनही आवश्यक ती कागदपत्रे वेळेवर मिळतील याची शाश्वती नसते. नेमकी हीच बाब लक्षात घेऊन जयश्रीताई शेळके यांच्या संकल्पनेतून भूमिपुत्र अभियान सुरु करण्यात आले आहे.
