कैचीने वार करून मनोरूग्ण मुलाने केली पित्याची हत्या* नांद्राकाळी येथील खळबळजनक घटना

कैचीने वार करून मनोरूग्ण मुलाने केली पित्याची हत्या
* नांद्राकाळी येथील खळबळजनक घटना
बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
    क्षुल्लक कारणावरून मनोरूग्ण मुलाने कैची ने वार करून पित्याची निघृण हत्या केल्याची घटना शनिवार 23 ऑक्टोबर रोजी दुपारी 1 वाजेदरम्यान बुलडाणापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या नांद्राकोळी येथे घडली. याप्रकरणी आरोपी मनोरूग्ण मुलाविरूध्द ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीला अटक करण्यात आली आहे.
    
 पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अधिक वृत्त असे की, नामदेव विठोबा उज्जैनकर वय 74 हे पत्नी व मुलासह नांद्राकोळी येथे राहतात. त्यांचा मुलगा प्रफुल्ल वय 40 हा मनोरूग्ण असल्याने त्साच्या विकृत वागण्यामुळे नेहमीच कुठल्या ना कुठल्या कारणाने वाद होत होते. दरम्यान शनिवार 23 ऑक्टोबर रोजी दोघा बाप लेकात किरकोळ कारणावरून वाद झाला. या वादात संतप्त झालेल्या मनोरूग्ण प्रफुल्ल नामदेव उज्जैनकर याने आपल्या वृध्द पित्याच्या छातीवर कैची ने सपासप वार केले. यामध्ये वृध्द पित्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी मृतक वृध्दाच्या पत्नीने ग्रामीण पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून पोलीसांनी आरोपी प्रफुल्ल उज्जैनकर याचे विरूध्द खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे. अधिक तपास प्रभारी ठाणेदार सोनकांबळे यांच्या मार्गदर्शनात राजिक शेख करीत आहेत.