जिल्हयातील नगर परिषद, नगर पंचायतींकडून लघु वृत्तपत्रांवर अन्याय* जाहिराती न मिळाल्यास आंदोलन करण्याचा महाराष्ट्र लढा पत्रकार संघटनेचा इशारा

जिल्हयातील नगर परिषद, नगर पंचायतींकडून लघु वृत्तपत्रांवर अन्याय
* जाहिराती न मिळाल्यास आंदोलन करण्याचा महाराष्ट्र लढा पत्रकार संघटनेचा इशारा
बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
      जिल्हयातील शासनाच्या जाहिरात यादीवर असलेल्या साप्ताहिक वृत्तपत्रांवर होत असलेल्या अन्याया विरूध्द महाराष्ट्र लढा पत्रकार संघटनेच्यावतीने जिल्हाधिकारी बुलडाणा यांना निवेदनाव्दारे शासनमान्य जाहिरात यादीवर असलेले साप्ताहिकांना जिल्हयातील नगर पंचायती, नगर परिषदांकडून शासकिय जाहिराती व निविदांचे वितरण केले जात नाही. नियमानुसार व शासन निर्णयानुसार   साप्ताहिक वृत्तपत्रांना सुध्दा जाहिरात देता येते परंतु नगर परिषद व नगर पंचायतींकडून साप्ताहिक वृत्तपत्रांना रोष्टर पध्दतीने जाहीराती न देता हेतुपुरस्सर डावलण्यात येते. मात्र शासन यादीवर नसलेल्या आणि जिल्हयाबाहेरील वृत्तपत्रांना संबंधित अधिका-यांना चिरीमिरी देवून जाहिराती दिल्या जातात. हा एक प्रकारे साप्ताहिक वृत्तपत्रांवर अन्याय आहे. या विरोधात महाराष्ट्र लढा पत्रकार संघटनेने लढा उभारला असून, याबाबत जिल्हाधिकारी यांनी महाराष्ट्र लढा पत्रकार संघटनेच्या निवेदनाची दखल घेवून संबंधित नगर परिषद व नगर पंचायतींना पत्र देवून जाहिराती देणेबाबतच्या सूचना दिल्या आहेत. या उपरही शासन यादीवरील साप्ताहिकांना जाहिराती न मिळाल्यास महाराष्ट्र लढा पत्रकार संघटना जिल्हयातील सर्व लघु वृत्तपत्रांच्या मागे ठामपणे उभी राहणार असून त्यांना न्याय न मिळाल्यास तिव्र आंदोलन करण्याचा इशारा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष लुकमान शाह यांनी दिला आहे.