महिलेचा गळा चिरणारा निघाला गावातलाचं* दागिण्याच्या मोहापायी खून केल्याची दिली कबुली

महिलेचा गळा चिरणारा निघाला गावातलाचं
* दागिण्याच्या मोहापायी खून केल्याची दिली कबुली
बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
 बकऱ्या चारण्यासाठी रानात गेलेल्या एका विधवा महिलेचा गळा चिरून निघृण खून केल्याची घटना शनिवार 16 ऑक्टोबर रोजी चिखली तालुक्यातील केळवद येथे उघडकीस आली होती. दरम्यान या प्रकरणात पोलीसांनी गावातीलचं काही संशयीतांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्यातील एका 37 वर्षीय  आरोपीला पोलीसी खाक्यात विचारपूस केली असता त्याने मृत महिला राधाबाई हिवाळे 65 यांच्या अंगावरील सोन्याचे दागिणे लुटण्यासाठी तिचा गळा चिरून खून केल्याची कबुली पोलीसांना दिली. खून करणारा आरोपी हा केळवद येथीलच प्रकाश शेनफड हिवाळे असल्याचे निष्पन्न झाल्याने गावासह चिखली व बुलढाणा तालुक्यात खळबळ उडाली आहे.