बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
उत्तर प्रदेशच्या लखिमपूर खिरी येथे सहा शेतकऱ्यांना क्रूरपणे गाडीखाली चिरडणाऱ्या आधुनिक जनरल डायर योगी सरकारच्या निषेधार्थ सोमवार 11 ऑक्टोबर रोजी महाविकास आघाडी सरकारच्यावतीने महाराष्ट्र बंद चे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला बुलडाणा शहरात शतप्रतिशत तर, जिल्हयात संमिश्र प्रतिसाद मिळाला.
महाराष्ट्र बंदच्या अनुषंगाने आज सकाळी कॉंग्रेस कमेटीच्यावतीने शहरातून मोटार सायकल रॅली काढण्यात आली होती. तर शिवसेनेचे आ. संजय गायकवाड यांच्या नेतृत्वातही शहरातून मोटार सायकल रॅली काढून बंदचे आवाहन करण्यात आले होते. बुलडाणा शहरातील जयस्तंभ चौक, बाजार लाईन मधील प्रतिष्ठाने, सोनार गल्ली, खान कॉम्प्लेक्स, तहसिल चौक, सक्युलार रोड, संगम चौक या भागातील व्यापाऱ्यांनी आपली प्रतिष्ठाने बंद ठेवून बंदमध्ये सहभाग घेतला होता. यावेळी आमदार संजय गायकवाड, जिल्हाप्रमुख जालिंधर बुधव, मुन्ना बेंडवाल, शहरप्रमुख गजेंद्र दांदडे, संजय हाडे, सुनिल भाग्यवंत, लखन गाडेकर, कुणाल गायकवाड, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जि.प.सदस्य डि.एस. लहाने, अनिल बावस्कर, अॅड.सुमित सरदार यांच्यासह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठया संख्येने सहभागी झाले होते.
