कोविड 19 ने मृत्यू पावलेल्यांच्या वारसांना 50 हजार रूपये सानुग्रह अनुदान* जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रार निवारण समिती स्थापन

कोविड 19 ने मृत्यू पावलेल्यांच्या वारसांना 50 हजार रूपये सानुग्रह अनुदान
* जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रार निवारण समिती स्थापन

बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
       कोविड 19 ने मृत्यू पावलेल्यांच्या वारसांना 50 हजार रूपये सानुग्रह अनुदान मिळणार आहे. मा. सर्वोच्च न्यायालयाचे 30 जुन 2021 रोजीच्या आदेशानुसार कोविड 19 या आजाराने मयत झालेल्या व्यक्तींच्या वारसांना 50 हजार रूपये एवढे सानुग्रह अनुदान देण्यासाठी राज्यांना सूचीत केले आहे. त्यानुसार प्रधान सचिव, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभाग यांनी त्यांच्या पत्राअन्वये 50 हजार रूपये सानुग्रह अनुदान वाटपासाठी प्राधिकरण स्थापन करण्यात आले आहे.
      जिल्हाधिकारी हे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे पदसिद्ध अध्यक्ष आहेत. याबाबत तक्रार निवारण समिती स्थापन करण्यात आलेली असून समितीचे सदस्य सचिव जिल्हा शल्य चिकित्सक, सामान्य रूग्णालय,बुलडाणा हे आहेत. याबाबतची तक्रार निवारण समितीचे सदस्य सचिव हे सर्व कार्यवाही करतील. सानुग्रह अनुदान 50 हजार रूपयांचे वाटप होण्यासाठी मदत व पुनर्वसन विभाग यांच्याकडून अर्ज सादर करण्याची कार्यपद्धती लवकरच अधिसूचीत करण्यात येणार आहे. त्याबाबत स्वतंत्रपणे कळविण्यात येणार आहे, असे निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.