बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
तालुक्यातील साखळी बु. येथील अंगणवाडी केंद्र क्र. २ व केंद्र क्र. ६ च्या इमारतीचे बांधकाम जि. प. सदस्य ॲड.जयश्रीताई शेळके यांच्या प्रयत्नांतून पूर्ण करण्यात आले आहे. दरम्यान २६ ऑक्टोबर रोजी जिल्हा परिषदेच्या महिला व बांधकाम सभापतींच्या हस्ते या इमारतींचे लोकार्पण झाले.
ग्रामीण भागांमध्ये अंगण परिसरात चालवली जाणारी माहिती केंद्र म्हणजे अंगणवाडी. अंगणवाडीत महिला आणि बालकांच्या सर्वांगीण विकासावर अधिक भर दिला जातो. ३ ते ५ वर्ष वयोगटातील बालकांना पूर्व प्राथमिक शिक्षण देण्याचे महत्वाचे काम अंगणवाडी करतात. त्यामुळे अंगणवाडी ह्या ज्ञानमंदिर आहेत. साखळी बु. हे साखळी बु. जि. प. गटातील सर्वात मोठे गाव आहे. गावाची लोकसंख्या साधारण ९ हजाराच्या आसपास असून गावामध्ये एकूण ८ अंगणवाडी केंद्र आहेत. परंतु एकाही अंगणवाडीची स्वतःची इमारत नव्हती. अंगणवाडी केंद्रांना स्वतःची इमारत असावी याकरिता लोकप्रतिनिधी या नात्याने जि. प. सदस्य ॲड.जयश्रीताई शेळके यांनी सातत्याने पाठपुरावा केला. अंगणवाडी केंद्रासाठी ग्रामपंचायतकडून जागा उपलब्ध व्हावी यासाठी जि. प. चे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी षण्मुगराजन एस. यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजनही केले होते. त्यामुळेच अंगणवाडी केंद्रांच्या जागेची अडचण दूर होऊ शकली. अंगणवाडी क्र. २ आणि क्र. ६ च्या इमारतीचे बांधकाम जिल्हा वार्षिक योजनेतून पूर्ण झाले आहे. दरम्यान २६ ऑक्टोबर रोजी या दोन्ही इमारतींचे जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती ज्योतीताई पडघान यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.
यावेळी पं. स. सभापती उषाताई चाटे, सरपंच सुनीताताई भगत, अशोकराव पडघान सरपंच सौ.सुनिताताई भास्कर भगत, ग्रा.स.सौ.विजयाताई अनिल कोळसे, सौ.शिलाताई शंकर सुरडकर, सौ.कमलबाई आंबादास चौथनकर, सौ.वर्षाताई श्रीकांत आराख, सौ.रेखाताई श्रीराम बोराडे, सय्यद अन्सार सैय्यद अक्तर, माजी सरपंच श्री.मोतीभाऊ लवंगे, साखळी सर्कल समन्वयक श्री.सोमप्रकाश डोमळे, माजी पंचायत समिती सदस्य शंकरसेठ चौधरी, माजी उपसरपंच श्रीराम बोराडे, माजी उपसरपंच नारायण सोनुने, एस.सी.सेल काँग्रेस तालुका अध्यक्ष प्रकाशभाऊ मोरे, निलेश लहासे, मधुकर जुमडे, संजय गायकवाड, सुनिल आराख, मदन आराख, शेख बशिर शेख वजिर, शंकरमामा सुरडकर, सुशिल आराख, विजय हिवाळे, श्रीकांत आराख, सुमनबाई सुरोशे, अनिलभाऊ कोळसे, बबन विरशिद, नामदेव सपकाळ, ग्रामसेवक खिल्लारे मॅडम, ग्रामपंचायत कर्मचारी नारायण चौधरी, दिलीप चौधरी, अंकुश देशमुख, शरद खिल्लारे, अंगणवाडी सुपरवायजर सुनिताताई रिंढे, अंगणवाडी सेविका संजना मोकासरे, प्रिती धुमाळ, माधुरी पाटील, संगिता सोनवणे, रुक्मिणी डोईफोडे, जुबेदा बी शेख अक्रम, मनोरमा राजमाने, ललिता सोनवणे, अनुसया लहासे, रंजना बनकर, दुर्गा सुरडकर, सरस्वती नवले, वैशाली सुरडकर, माया आराख यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
