* स्वतंत्र महाराष्ट्र कामगार संघटनेची मागणी
बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
मजूर कामगारांच्या अर्जासोगत आवश्यक असलेले नव्वद दिवस काम केल्या प्रमाणपत्रावर ग्रामीण भागात ग्रामसेवक व शहरी भागासाठी नगर परिषद सिईओं यांची स्वाक्षरी ग्राहय धरणेबाबतचा स्पष्ट जीआर निर्गमित करा, अशी मागणी स्वतंत्र महाराष्ट्र कामगार संघटनेने केली आहे.
इमारत व ईतर बांधकाम मंडळाचे कामगार अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात नमूद आहे कि, शासनाने 23 सप्टेंबर 2021 रोजी जाहिर केलेल्या शासन निर्णयानुसार नोंदणीचे अधिकार कामगार अधिका-यांना देण्यात आले आहेत. त्यामुळे ग्रामपंचायत व शहरी भागात सिईओंनी नव्वद दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र देणे बंद केले आहे. शासनाकडून जाहीर करण्यात आलेला जीआर हा केवळ नोंदणी संदर्भातला आहे मात्र यामुळे गोंधळ उडाला असून, शासनाने प्रमाणपत्र देणे संदर्भातील स्पष्ट आदेश घोषित करावा अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनावर महिला अध्यक्षा सुवर्णा वडोदे, सुनील धोटे, बलदेव साळवे, रविंद्र कदम, सुनील आराख, चांद शाह आदींच्या स्वाक्ष-या आहेत.
