चिखली :( प्रतिनिधी) ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादूल अर्थात एमआयएमच्या शहराध्यक्ष पदी मुनव्वर यांची फेरनिवड करण्यात आली आहे. त्यांची ही नियुक्ती राज्याचे कार्याध्यक्ष अब्दुल गफ्फार कादरी यांनी एका पत्राव्दारे केली आहे. मुनव्वर यांनी आपल्या शहराध्यक्ष पदाच्या काळात पक्ष वाढीसाठी घेतलेली मेहनत आणि मुस्लिम समाजासह तळागाळातील लोकांना पक्षाच्या विचारधारेशी जोडण्याचे काम केले आहे. मुस्लिम आरक्षण मागणीसाठी त्यांच्या नेतृत्वाखाली समाजातील युवकांचा भव्य धरणे आंदोलन केले होते. याबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षीव होत आहे.