तुषार खरे यांची विद्यार्थी काँग्रेस (NSUI) बुलढाणा जिल्हा अध्यक्ष पदी नियुक्ती

तुषार खरे यांची विद्यार्थी काँग्रेस (NSUI) बुलढाणा जिल्हा अध्यक्ष पदी नियुक्ती
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
        सुंदरखेड येथील सामाजिक कार्यकर्ते तथा ग्रामपंचायत सुंदरखेड सावळा गटग्रामपंचायतीचे सदस्य,  युवा नेते तुषार खरे यांची बुलढाणा जिल्हा विद्यार्थी काँग्रेसच्या जिल्हा अध्यक्ष पदी नुकतीच निवड करण्यात आली. सदर निवड पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी एका आदेशान्वये आली आहे.

         गेल्या अनेक वर्षापासून तुषार खरे हे बुलढाणा शहरातच नव्हे तर संपुर्ण बुलढाणा जिल्हयामध्ये सामाजिक कार्यकर्ते म्हणून फार मोठी ओळख त्यांनी निर्माण केली आहे. सामाजिक कार्य करीत असतांना तळागळातील गोर-गरीब, कष्टकरी जनतेसाठी ते सातत्याने धावून जात असतात. सर्वांच्या सुख-दुखात मदतीचा हात देणे हा त्यांचा स्वभाव गुण असून कोरोना काळामध्ये सुंदरखेड परिसरातील गोर-गरीबांना भेटी देऊन त्यांनी सर्वांच्या सुख-दुःखात मदतीचा हात दिलेला आहे,  हे विशेष ! एवढेच नव्हे तर युवकांसाठी जिल्हयामध्ये विविध प्रकारच्या स्पर्धा आयोजित करणे व युवकांना उत्तेजन देणे यामधून चांगले युवक घडविण्याची त्यांची कार्यशैली सातत्याने सुरु असल्याचे दिसून येत आहे. त्यांच्या या विविध सामाजिक कार्याची नोंद घेऊन काँग्रेस पक्षांनी त्यांच्यावर विद्यार्थी सेलचे जिल्हाध्यक्ष म्हणून फार मोठी जबाबदारी सोपविण्यात आलेली आहे. यामुळे बुलढाणा शहरातील नव्हे तर संपुर्ण जिल्हयात या निवडीमुळे काँग्रेस कार्यकर्त्यामध्ये नवे चैतन्याचे व आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

        भविष्यात पक्षाशी एकनिष्ठ राहुन पक्ष वाढविण्यासाठी अहोरात्र मेहनत घेणार असल्याचे मत तुषार खरे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलतांना व्यक्त केले आहे.