शाह छप्परबंद समाजाला जातीच्या दाखल्यांसाठी येणारी अडचण दूर करावी

अन्यथा विदर्भ प्रदेशाध्यक्ष लुकमान शाह मंत्रालयासमोर करणार आत्मदहन बुलढाणा- शाह छप्परबंद समाजातील व्यक्तींना जातीच्या दाखल्यांसह जात वैधता प्रमाणपत्रांसाठी प्रशासकिय पातळीवर अनेक अडचणी येत आहेत. त्यामुळे या समाजातील सुशिक्षित तरूण वर्ग आणि सर्वसामान्यांना विविध शासकिय योजनांच्या लाभापासून वंचित राहण्याची पाळी आली आहे. परिणामी हा समाज प्रगतीच्या प्रवाहापासून दूर राहत आहे. त्यामुळे या समाजाला जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्रासाठी येणा-या अडचणी तत्काळ दूर करून जात प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही करावी अन्यथा 25 नोव्हेंबर रोजी मुंबईतील मंत्रालयासमोर आत्मदहन करण्याचा गंभीर ईशारा संघटनेचे विदर्भ प्रदेशाध्यक्ष लुकमान शाह यांनी एका निवेदनातून दिला आहे.

याबाबत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंढे यांना 27 ऑक्टोबर रोजी दिलेल्या निवेदनात नमूद आहे कि, ज्या व्यक्तीकडे शाह फकिर या जातीचा उल्लेख असलेल्यांना विमुक्त जातीचे छप्परबंद असल्या जात प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र देण्याचे आदेश आपले स्तरावरून सर्व जिल्हाधिकारी तसेच जात पडताळणी समितीला दयावे.  महाराष्ट्रात छप्परबंद ही जात शासनाने विमुक्त जातीमध्ये समाविष्ट केलेली आहे. या जातीचा उल्लेख अनुक्रमांक 14 वर आहे. त्या जातीचा उल्लेख पुढीलप्रमाणे आहे. 1 मुस्लिम धर्मिय 2 त्यांच्या नावासमोर शाह असा उल्लेख 3 पुर्विच्या नोंदीमध्ये फकिरचा उल्लेख या तिनही बाबी असतील त्या व्यक्तीस छप्परबंद जातीचे प्रमाणपत्र देण्यास काही हरकत नसावी असे परिपत्रक महाराष्ट्र शासनाने क्र.सीबीसी-10-2011 प्र.क्र. 135 मावक- 5 दि. 23 मार्च 2011 परंतु जात पडताळणी अधिकारी व इतर अधिकारी वर्ग वैधता किंवा दाखले देतेवेळी छप्परबंद नोंदी बाबत अडचणी निर्माण करित असल्याने महाराष्ट्र मुस्लिम शाह छप्परबंद संघर्ष समितीचे विदर्भ प्रदेशाध्यक्ष् लुकमान शाह यांनी प्रस्तुत निवेदनाव्दारे आत्मदहनाचा इशारा दिला आहे.