पती-पत्नीची आत्महत्या प्रकरणी: दोन सैनिकांसह सहा विरुद्ध गुन्हा दाखल

चिखली: तुमची बदनामी करू असे म्हणत पती-पत्नी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तालुक्यातील मेरा बुद्रुक परिसरातील देऊळगाव घुबे येथील दोन सैनिकांसह 6 जणा विरुद्ध 28 ऑक्टोंबर रोजी तक्रारीवरून अंढेरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीवरून वृत्त असे की मृतकाचा भाऊ ज्ञानेश्वर रमेश घूबे वय पंचवीस वर्ष राहणार देऊळगाव घुबे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, त्यांचा  मृतक भाऊ गणेश घुबे यांच्या पत्नी ज्योती गणेश घुबे हिने 24 सप्टेंबर रोजी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. दरम्यान मृतक गणेश च्या पत्नीस सैन्यदल कार्यरत सैनिक किशोर सुखदेव घुबे व त्याचा मित्र सैनिक शुभम करपे हे दोघे मृतक गणेश च्या पत्नीस मानसिक त्रास देत होते.  तसेच अश्लील फोटो काढून तुझी बदनामी करू आशा धमक्या दिल्याने मृतक गणेशच्या पत्नीने 24 सप्टेंबर 2020 रोजी  आत्महत्या केली होती. तरी याच कारणावरून उपरोक्त दोघे सैनिक आरोपी हे मृतक गणेशला तुला व तुझ्या मुलीला जीवाने मारून टाकू व तुला आत्महत्या करण्यास मजबूर करू अशा धमक्या नेहमी देत होते. त्यामुळे आरोपींच्या या मानसिक त्रासाला कंटाळून गणेश रमेश  घुबे याने 17 ऑक्टोंबर 2020 रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यामुळे गणेश व त्याच्या पत्नीने किशोर घुबे व शुभम करपे यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची तक्रार पोलिस स्टेशनला दिली. आशा तक्रारीवरून अंढेरा पोलिसांनी आरोपी सैनिक किशोर घुबे व शुभम करपे, सुखदेव भास्कर घुबे, शंकर सुखदेव घुबे, शोभा सुखदेव घुबे, गणेश बबन लोखंडे राहणार सर्व देऊळगाव घुबे या सहा आरोपी विरुद्ध कलम 306, 34 भादवि नुसार गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणाचा पुढील तपास सपोनि नरेंद्र ठाकरे हे करीत आहे.