चिखली : मुस्लिम समाजाला पाच टक्के आरक्षण देण्यात यावे, अशी मागणी काँग्रेस अल्पसंख्याक सेलच्या वतीने २६ ऑक्टोबर रोजी एका निवेदनव्दारे तहसीलदर यांच्याकडे केली आहे.
मुस्लिम समजाला शासनाकडून आरक्षणात पाच टक्के आरक्षण देण्यात आले होते. न्यायालयाने देखील हे आरक्षण मान्य करून चालू ठेवण्यास सांगितले हाते. परंतु मागील भाजपा सरकारने मुस्लिम आरक्षणाचे नोटीफिकेशन संपल्यावर नवीन नोटीफिकेशन काढले नाही, किंवा याबाबतीत नवीन विधेयकही आणले नाही. त्यामुळे मुस्लिमांना त्यांच्या हक्काचे आरक्षण मिळत नाही. महाविकास आघाडी सरकारने आपल्या जाहीरनाम्यात मुस्लिम समाजासाठी आरक्षण जाहीर केले आहे. त्यामुळे सध्याचे विद्यमान सरकार मुस्लिम समाजाला न्याय देईल असा विश्वास आहे. संपूर्ण राज्यात कायमस्वरूपी आरक्षण देण्यात यावे, अशी मागणी अल्पसंख्याक विभागाचे शहर अध्यक्ष खालील बागवान यांच्या नेतृत्वात अनेक मुस्लिम कार्यकर्त्यांनी निवेदनाव्दार केली आहे. यावेळी निवेदन देताना काँग्रेस शहर अध्यक्ष अतहरोद्यीन काझी, डॉ. मोहमद इसरार, नगरसेवक रफिक सेठ, राज़ रज्जाक, दिपक खरात, आशिफ भाई, हाजी अब्लूल रउफभाई, शेख अन्वर पेंटर. मो. राशिद, मो. सादिक, बासिद जमदार, मो. मलीक, शेख फारूख, मो. जक्काउल्ला, शेख रफिक, शेख असल्म, नजिम खान, शेख सरदार, शेख अन्सार, शेखा गबुभाई, आसिफ, अकिल, अशपाक मिस्त्री, शेख शफिक, शेख रफिक शेख चाँद, शेख अफसर, शेखा गब्बार यांच्यासह असंख्य मुस्लिम कार्यकर्ते उपस्थित होते.
