गरिबीशी संघर्ष करत पुर्नेश चव्हाण यांची मुंबई महानगरपालिकेत निवड!* करवंडच्या तरुणाची ‘ट्रीटमेंट ऑर्गनायझर’ पदावर नियुक्ती; जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर यशाला गवसणी

गरिबीशी संघर्ष करत पुर्नेश चव्हाण यांची मुंबई महानगरपालिकेत निवड!
* करवंडच्या तरुणाची ‘ट्रीटमेंट ऑर्गनायझर’ पदावर नियुक्ती; जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर यशाला गवसणी
बुलढाणा  : (एशिया मंच न्यूज )
      प्रतिकूल आर्थिक परिस्थिती, मर्यादित साधने आणि अनेक अडचणींवर मात करत जिद्द व मेहनतीच्या जोरावर करवंड येथील पुर्नेश गणेश चव्हाण यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. त्यांची मुंबई महानगरपालिकेत ‘ट्रीटमेंट ऑर्गनायझर’ (उपचार संघटक) या पदावर निवड झाली आहे. त्यांच्या या यशामुळे करवंड परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

      सामान्य कुटुंबातील पुर्नेश चव्हाण यांचा शासकीय सेवेत स्थान  मिळविण्यापर्यंतचा प्रवास संघर्षमय राहिला. आर्थिक परिस्थिती प्रतिकूल असतानाही त्यांनी शिक्षणाची कास सोडली नाही. अडचणींना न डगमगता ध्येय निश्चित करून सातत्यपूर्ण अभ्यास, मेहनत आणि जिद्दीच्या बळावर त्यांनी हे यश मिळविले.
        मुंबईसारख्या महानगरात महानगरपालिकेच्या सेवेत काम करण्याची संधी मिळणे ही त्यांच्या कुटुंबासाठी आनंदाची आणि अभिमानाची बाब ठरली आहे. त्यांच्या निवडीने सामान्य परिस्थितीतून पुढे येऊन स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून यश मिळवू पाहणाऱ्या तरुणांसमोर एक प्रेरणादायी उदाहरण निर्माण झाले आहे.
          पुर्नेश चव्हाण यांच्या या यशाबद्दल कुटुंबीय, मित्रपरिवार, नातेवाईक आणि करवंड परिसरातील नागरिकांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत असून पुढील सेवावाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.