दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मोताळ्यात शेतकरी मदत केंद्र सुरू* ॲड.जयश्रीताई शेळके यांच्या पुढाकाराने उपक्रम; जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. नरेंद्र खेडेकर यांच्या हस्ते उद्घाटन

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मोताळ्यात शेतकरी मदत केंद्र सुरू
* ॲड.जयश्रीताई शेळके यांच्या पुढाकाराने उपक्रम; जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. नरेंद्र खेडेकर यांच्या हस्ते उद्घाटन
मोताळा : (एशिया मंच न्यूज )
       दुष्काळी परिस्थितीमुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळविताना येणाऱ्या अडचणी दूर करण्याच्या उद्देशाने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या राज्य प्रवक्त्या ॲड. जयश्रीताई शेळके यांच्या पुढाकाराने मोताळा येथे शेतकरी मदत केंद्र सुरू करण्यात आले आहे. या केंद्राचे उद्घाटन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हा संपर्कप्रमुख नरेंद्र खेडेकर यांच्या हस्ते करण्यात आले.

      या शेतकरी मदत केंद्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांना विविध शासकीय योजनांची माहिती, आवश्यक कागदपत्रांबाबत मार्गदर्शन आणि अर्ज प्रक्रियेसंदर्भात मदत केली जाणार आहे. शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठीही प्रयत्न करण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आणि त्यांच्या प्रश्नांना योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. याच धर्तीवर जिल्ह्यातील इतर शहरांमध्येही शेतकरी मदत केंद्रे सुरू करण्याचा उपक्रम हाती घेण्यात येणार आहे.

      या उद्घाटनप्रसंगी जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवत, जिल्हा समन्वयक गजानन धांडे, विधानसभा संघटक सुनील घाटे, शहर प्रमुख रमेश धुनके, सामाजिक न्याय आघाडी जिल्हाप्रमुख मिलिंद गवई, मलकापूर तालुकाप्रमुख दीपक चांभारे, युवासेना मोताळा तालुकाप्रमुख मोहित राजपुत, मोताळा महिलाआघाडी तालुका प्रमुख कल्पना पुरी, अनिता जाधव, संगीता कोळसे, शितल सरोजकार, तालुकाप्रमुख जितु खराटे, उपतालुकाप्रमुख साबु शेठ, यादवराव मोहाडे, विभागप्रमुख विनोद ढोण, योगेश पैसोडे, अक्षय जवरे, योगेश महाजन यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.