नांदेडमध्ये अभिता ऍग्रोच्या कृषी ड्रोन सेवेचा शुभारंभ * शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, शेतीच्या संधींबाबत चर्चा

नांदेडमध्ये अभिता ऍग्रोच्या कृषी ड्रोन सेवेचा शुभारंभ 
* शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, शेतीच्या संधींबाबत चर्चा 

बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
      शेती, माती आणि नाती जपणाऱ्या अभिता कंपनीच्या कृषी ड्रोन सेवेचा १६ सप्टेंबर रोजी नांदेड जिल्ह्यात शुभारंभ करण्यात आला. शेतकऱ्यांसोबत संवाद साधत शेतीच्या प्रगतीसाठी नवा संकल्प करण्यात आला.

          शेलगाव ता. देगलूर, जि. नांदेड येथे बुधवारी शेतकरी संवाद कार्यक्रम यशस्वीरीत्या संपन्न झाला. यावेळी शेतकरी बांधवांशी प्रत्यक्ष संवाद साधत त्यांच्या शेतीविषयक गरजा, अडचणी आणि आधुनिक शेतीच्या संधींबाबत चर्चा करण्यात आली. याप्रसंगी संपूर्ण नांदेड जिल्ह्यात कृषी ड्रोन सेवेचा शुभारंभ करण्यात आला. आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेती अधिक कार्यक्षम, सुलभ आणि उत्पादनक्षम करण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. अभिता ऍग्रो इंडस्ट्रीजच्या उत्पादनांना शेतकरी बांधवांकडून मिळत असलेला उत्स्फूर्त आणि प्रचंड प्रतिसाद शेतकऱ्यांच्या विश्वासाची पावती असल्याचे संस्थापक सीईओ सुनील शेळके यांनी सांगितले.