तैलिक महासभा बुलडाणा जिल्हा युवा आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी तानाजी पैठणे* राजर्षी शाहू परिवारातर्फे सत्कार

तैलिक महासभा बुलडाणा जिल्हा युवा आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी तानाजी पैठणे
* राजर्षी शाहू परिवारातर्फे सत्कार
   
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
     राजर्षी शाहू परिवाराचे सदस्य  तानाजी भाऊ पैठणे यांची बुलडाणा जिल्हा प्रांतिक तैलिक महासभा युवा आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल राजर्षी शाहू परिवारातर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. राजर्षी शाहू परिवाराचे संस्थापक अध्यक्ष तथा वन बुलडाणा मिशनचे संकल्पक संदिपदादा शेळके यांच्याहस्ते हा सत्कार करण्यात आला.
      यावेळी संदिपदादा शेळके यांनी  तानाजी पैठणे यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील सामाजिक व संघटनात्मक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. युवा नेतृत्वावर सोपविण्यात आलेली ही जबाबदारी युवकांच्या प्रश्नांसह समाजहिताच्या विविध विषयांवर प्रभावीपणे कार्य करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
 याप्रसंगी संस्थेचे संचालक  पृथ्वीराज राजपूत, सय्यद वसीम, सरव्यवस्थापक  दिलीप चव्हाण, आस्थापना अधिकारी पवन सावळे तसेच शाखा व्यवस्थापक अमोल सुसर उपस्थित होते.