सुनेहरे पल भाग ४ चे : बुलडाण्यात जुन्या-नव्या हिंदी गाण्यांची मैफल

सुनेहरे पल भाग ४ चे : बुलडाण्यात जुन्या-नव्या हिंदी गाण्यांची मैफल
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
        बुलढाणा शहरातील रसिक प्रेक्षकांसाठी आनंदाची बातमी आहे. बुलढाणा अर्बन कर्मचारी गणेशोत्सव मंडळाच्यावतीने "सुनेहरे पल भाग ४" या जुन्या-नव्या हिंदी गाण्यांच्या सुरेल कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

       हा सांस्कृतिक कार्यक्रम बुधवार २३ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ६.३० वाजता गोवर्धन सभागृह, बुलडाणा येथे होणार आहे. या कार्यक्रमात बुलडाणा अर्बनचे कर्मचारी आपली कला सादर करणार असून, जुन्या आठवणींना उजाळा देणारी तसेच नव्या पिढीला भुरळ घालणारी हिंदी गीते सादर होणार आहेत.

      कर्मचाऱ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी नागरिकांनी सहकुटुंब, सहपरिवार व इष्टमित्रांसह मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन बुलडाणा अर्बन कर्मचारी गणेशोत्सव मंडळ, बुलडाणा यांच्यावतीने करण्यात आले आहे.