अभिता कंपनीच्या कृषी ड्रोनला राज्यात वाढती मागणी* तांत्रिक शेतीकडे बळीराजाचा कल ; फवारणी झाली सोपी

अभिता कंपनीच्या कृषी ड्रोनला राज्यात वाढती मागणी
* तांत्रिक शेतीकडे बळीराजाचा कल ; फवारणी झाली सोपी
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
      अभिता कंपनीच्या कृषी ड्रोनला राज्यभरात मागणी वाढली आहे. कमी खर्चात अचूक फवारणी शक्य होत असल्यामुळे शेतकऱ्यांना जास्त उत्पादनाची हमी मिळत आहे. आधुनिक शेतीचा स्मार्ट साथीदार म्हणून या कृषी ड्रोनची ओळख निर्माण झाली असून तांत्रिक शेतीकडे बळीराजाचा कल वाढला आहे. 

        काळानुसार शेती करण्याची पद्धती सुद्धा बदलत आहेत. तांत्रिक आणि आधुनिक शेती करण्याला प्राधान्य देण्यात येत आहे. कमी वेळात जास्त कामे कशी उरकतील यावर शेतकऱ्यांचा जोर आहे. अभिता कंपनीने संस्थापक सीईओ सुनील शेळके यांच्या संकल्पनेतून शेतकऱ्यांसाठी कृषी ड्रोन तयार केला आहे. याद्वारे अचूक फवारणी शक्य होत आहे. कीटकनाशके, खते आणि सूक्ष्मपोषकांचे समान व अचूक फवारणी या ड्रोनच्या साहाय्याने केली जाते. सर्वात महत्वाचे म्हणजे 
वेळेची बचत होते. कमी वेळेत अधिक क्षेत्रावर फवारणी करण्याची ड्रोनची कार्यक्षमता आहे. हाय कॅपॅसिटी बॅटरीमुळे जास्त वेळ सतत काम करता येते. मोठ्या टाकीमुळे एकदा भरल्यावर अधिक क्षेत्रावर फवारणी शक्य होत आहे. हा ड्रोन सुरक्षित व वापरण्यास सोपा आहे. अभिता कंपनीने  कृषी ड्रोनचे खास युजर-फ्रेंडली डिझाइन तयार केले आहे. यामध्ये अत्याधुनिक सुरक्षा प्रणाली बसवण्यात आलेली आहे. 

* याठिकाणी ड्रोन उपलब्ध : 

       कृषी ड्रोनची वाढती मागणी पाहता अभिता कंपनीने जास्त जास्त ठिकाणी सेवा उपलब्ध करण्याचा प्रयत्न केला आहे. सध्या बुलढाणा, बारामती, जालना, नाशिकसह इतर ठिकाणी ड्रोन उपलब्ध आहे. बुकिंग सेवा सुद्धा सुलभ असून 843366 9665 या क्रमांकावर बुकिंग करता येते. शेतकऱ्यांनी सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.