भाईजींचा पुण्य संकल्प कार्यकर्त्यांनी केला पुर्ण* खाटुश्याम रेल्वे यात्रा म्हणजे आनंदाचा अविस्मरणीय सोहळा - प्रा. प्रकाशचंद्र पाठक

भाईजींचा पुण्य संकल्प कार्यकर्त्यांनी केला पुर्ण
* खाटुश्याम रेल्वे यात्रा म्हणजे आनंदाचा अविस्मरणीय सोहळा - प्रा. प्रकाशचंद्र पाठक
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
       स‌द्भावना सेवा समिती बुलडाणा द्वारा आयोजित  ३० ऑगस्ट ते  ५ सप्टेंबर पर्यंत खाटुश्याम येथे बालसंत श्री. दिपशरणजी महाराज यांची भागवत कथा आयोजित केली होती. मागील वर्षी सन २०२५ मध्ये भाईजींनी खाटुश्यामला रेल्वे यात्रा काढायची हा संकल्प केला. कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेवून पुर्ण केला ३० ऑगस्ट २०२६ ला १५० यात्रेकरूंना मलकापूर रेल्वे स्टेशनवर भाईजींनी सर्वांना निरोप व शुभेच्छा दिल्या. रेल्वेमध्ये सर्व व्यवस्था समितीने चोखपणे केली.

       खाटुश्यामला पोहचल्यानंतर ५१ कलशधारी महिला, उत्कृष्ठ बॅण्ड पथक, सुशोभीत रथा मध्ये बालसंत श्री. दिपशरणजी महाराज शोभायमान दिसत होते. शाम सतसंग भवन येथे भागवत कथेचे मुख्य यजमान सौ. सरला सुरेशचंद्र गट्टाणी पती-पत्नी यांनी भागवत कथा शिरावर धारण केली, पुजन व माल्यार्पण करुन कथेला प्रारंभ केले. स‌द्भावना सेवा समितीने भाईजींच्या मार्गदर्शनात काढलेली यात्रा म्हणजे गोवर्धन पर्वत उचलण्या सारखे होते. ह्याला भाईजींची करंगळी आणि कार्यकर्त्यांच्या काठ्या लागल्या होत्या. १ सप्टेंबर २०२६ राजस्थान संगित मंडळीद्वारा सुंदरकांड पार पडले. ह्यामध्ये गायक पंडीत विजयशास्त्री, पंडीत जयप्रकाशजी भोजपुरा, सजनजी, हरीनारायणजी रेणवाल यांनी सहभाग घेतला. ४ सप्टेंबर २०२६ ला स्पेशल बसने सालासर बालाजीचे दर्शन घडविले. भक्तांनी यात्रे बद्दल प्रतिक्रिया दिल्या भक्तीसेवा आणि सद्भावनेचा अविस्मिरणीय सोहळा, भक्तीची आनंद यात्रा, उत्कृष्ठ नियोजन, श्रध्दा व माणुसकीचा संगम म्हणजेच ही यात्रा असे मत श्रीकांत धारकर, शाम गट्टाणी, दिलीप अग्रवाल, भुपेंद्र भट, मधुकर ढोकणे, सोमेश्वर पेठकर, राजेंद्र भट, अरुण पाटील, शाम मुंघडा, नंदकिशोर तोतला, जगदीश आगरकर, शिला पॉल, उषा जैस्वाल, उज्वला राठी, माळीमामा सपकाळ अश्या अनेकांनी भावना व्यक्त केल्या.

        वांदुरबाजार येथील ज्ञानेश्वर कन्या प्रज्ञाचक्शु श्री संत गुलाबराव महाराज यांचे मार्गदर्शन ब्रम्हनिष्ठ श्री कुर्याजी महाराज यांच्या परिवारातील सुन श्रीमती दुर्गाबाई भट यांची उपस्थितीत उल्लेखनिय होती. त्यांनी दिपशरणजी महाराजांचा माल्यार्पण करुन समर्थन निधी अर्पण केला. विशेष म्हणजे दुर्गाबाई यांचा जन्मदिवस होता. महाराजांनी त्यांना हार घालुन शुभेच्छा दिल्या व गुलाबराव महाराजांची आस्थेने चौकशी केली. सर्व यात्रेकरुनी यशस्वी यात्रेचे श्रेय राधेश्याम चांडक यांना दिले. भाईजींमुळे आम्हाला यात्रा घडली म्हणुन भाईजींनी वारंवार अश्या यात्रा काढण्यासाठी त्यांना चांगले आरोग्य लाभो अशी प्रार्थना करुन वृध्दांनी आशिर्वाद दिले. समितीचे कार्याध्यक्ष चंपालाल शर्मा म्हणजे भान ठेवून योजना आखायच्या व बेभान होवून राबवायच्या याचे उत्तम उदाहरण आहे. जगदीश आगरकर यांनी स्वलिखीत खाटुश्याम चालीसा पुस्तकाचे निशुल्क वितरण केले. उपक्रम यशस्वी होण्यासाठी सुभाष शर्मा, राजेश शर्मा, प्रदिप शर्मा, शिवकुमार जोशी, गजानन डुंगरी, लाला माधवाणी, पुरणमल शर्मा, सुभाष घोरपडे, धनंजय गायकवाड, राजेश अगरवाल, मधुकर गायकी, मनमोहन शर्मा, गिरधारी शर्मा, गोपाल बागास यांनी सहकार्य केले. महाराजांनी त्यांचा दुपट्टा देवून सत्कार केला सर्व यात्रेकरूंना स्मृती भेट म्हणुन साडी, बॅग व पर्स देण्यात आली. निरोप घेतांना व कथा ऐकतांना अनेकांच्या डोळ्यात अश्रु होते. समितीचे राजेश देशलहरा, चंपालाल शर्मा, सुरेशचंद्र गट्टाणी, प्रकाशचंद्र पाठक, तिलोचंद चांडक, सिध्दार्थ शर्मा, विजय व्यवहारे, सुभाष दर्डा यांनी परिश्रम घेतले. या संपुर्ण कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार स‌द्भावना सेवा समितीचे सचिव प्रकाशचंद्र पाठक यांनी केले.